मुंबई प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधला.
‘मराठा आरक्षणावर सर्व पक्षाने एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठिंबा दिला. उच्च न्यायालयात याला आव्हान दिलं ते आपण जिंकलो. सर्वोच्च न्यायालयात आता लढत आहोत. पहिल्या सरकारने जे वकील दिलेत ते बदलले नाहीत. वकील कमी न करता आणखी वकील वाढवत आहोत. सर्वोच्च न्यायालयात कुठेही कमी पडलेलो नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘आपण दिलेलं आरक्षणाला स्थगिती देण्याचा अनपेक्षित निर्णय़ दिला गेला. यावर सविस्तर चर्चा करत आहे. ज्या संस्था पोटतिडकीने मागणी मांडत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे ठरवून बाजू मांडली. तरी हा निर्णय आला.’ विरोधीपक्ष नेत्यांनी देखील कोणतंही राजकारण न करता आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाला मला एक विनंती करायची आहे. अन्याया विरोधात लढा. पण सरकार साथ देत नसेल तेव्हा. पण सरकारने तुम्हाला साथ दिली आहे. तुमच्या मागण्यांना न्याय दिलेला आहे. पण आव्हान दिल्यानंतर सरकार तुमच्यासाठी न्यायलयात बाजू मांडत आहे. तुमच्यासाठी भांडत आहोत. असं देखील मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.