TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशातील तीन अभियंत्यांनी शेतकऱ्यांसाठी बनविले ‘बागायत बाजार’ मोबाईल अॅप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जगाच्या कानाकोप-यात कुठेही असले तरी मातृभूमीविषयीची तळमळ काहींना अजिबात स्वस्थ बसू देत नाही. याच जाणिवेतून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जर्मनीस्थित डॉ.प्रविण पाटील, त्यांचे मित्र डॉ. शांताराम शेणई,सिंगापूर स्थित नंदलाल पाटील यांनी ख़ास शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून बागायत बाजार (आपला बाजार आपल्या हातात), हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर हे अॅप लॉचं केले जाणार आहे.

ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठी नवीन उपक्रम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा आणि आधुनिक शेती विषयी माहिती व त्याची ट्रेनिंग देणे हा सुद्धा त्यांचा एक उद्देशआहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी अनुभवल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. ह्या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी एकमेकांसोबत जोडले जातील आणि एका मोठ्या शेतकरी कुटुंबाचा हिस्सा बनतील. ह्या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या शेती संबंधित साहित्य, पशु-पक्षी, वाहने आणि बरेच काही वस्तु ज्या पडुन-पडुन ख़राब होतात, जसे पाईप,पंप इत्यादी खरेदी विक्री करु शकतात. तसेच शेतीसंबंधित वाहने भाड्याने देणे-घेणे इत्यादी करू शकतात. त्यांना स्वतःला अनुभव आहे की शेतक-याला आजच्या घडीला जर बैल ,म्हैस विकायचे असतील तर वाहन (टेम्पो) करून, तो प्राणी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावा लागतो. एवढा वाहतूक खर्च करून बाजारात आल्यामुळे तो अनपेक्षित किमतीत विकावा लागतो किंवा पुन्हा खर्च करून घरी परत आणावा लागतो. यात पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होतात.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

ह्या अ‍ॅपचा वापर करून जर आपण बैल ,म्हैस याविषयी माहिती आणि फोटो पोस्ट केला तर शेतकऱ्याला घरी बसल्या गिऱ्हाईक मिळेल. विकत घेणारा आणि विकणारा दोघांचा वेळ आणि पैसा वाचेल. एखादा शेतकरी वाहन/ट्रॅक्टर भाड्याने देत असेल तर तो आपल्या अ‍ॅपचा उपयोग करून वाहना विषयी माहिती पोस्ट करू शकतो आणि त्याला घरी बसल्या गिऱ्हाईक मिळतील. यात भाड्याने घेणारा आणि देणारा दोघांचाही फायदा होईल. ही फक्त काही उदाहरणे झालीत अशी भरपूर उदाहरणे आहेत की ज्यामुळे ह्या अ‍ॅपचा वापर करून शेतक-यांच्या आयुष्यात काही गोष्टी सोप्या आणि कमी खर्चात होतील. सर्वात महत्वाचे सांगायचे म्हटले तर शेतकऱ्यांना ह्या सर्व सुविधा विनामूल्य मिळणार आहे. वरील सर्व सेवा त्यांनी पहिल्या टप्प्यात (‘फेज-वन’) मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. जर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील टप्प्यात अजून काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहेत.

 

उदाहरणार्थः

१. अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना शेती विषयक शासकीय योजनांची माहिती आणि संकेत स्थळ उपलब्ध करून देणे.

२. शेती विषयक चर्चा , शेतकरी फोरम च्या मदतीने शेतकरी एकमेकांना शेतीविषयक सल्ले, प्रश्न विचारू शकतो. जसे पीकावरील रोग, योग्य बियाणे खत विषयी माहिती इत्यादी

३. महिला बचत गट किंवा शेतकरी कुटुंबाने घरी बनवलेल्या वस्तू आणि पदार्थ विक्रीसाठी या ॲपचा उपयोग होऊ शकतो जसे लोणची,पापड, मसाला त्याचप्रमाणे भाज्या, फुले ,फळे इत्यादी

४. शेतीविषयक सेवा आणि व्यापार यासाठी जाहिरात -उदाहरणार्थ बोअरवेल करणारे, बांधकाम करणारे, विहिर खोदणारे, पीक व प्राणी विमा देणारे, बी -बियाणे विकणारे इत्यादी

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

अॅप लाँच झाल्यानंतर प्रथम मी माझ्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केले.माझ्याकडे असलेले रोटव्हेटर जे मी २ वर्षांपासून मित्रांना सांगुन विक्रीचा प्रयत्न करत होतो पण काही केल्या विक्री होत नव्हते.बागायत बाजार अॅपमध्ये मी रोटव्हेटरचा फोटो टाकल्यानंतर थोड्याच वेळात अपेक्षित किमतीत त्याची विक्री मला घर बसल्या करता आली.

(नंदलाल हिलाल पाटील, शेतकरी तासखेडा)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

May 11, 2026
Next Post

जळगावात दोन गटात दगडफेक; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी आणली रंगत ; पालकमंत्र्यांच्या हस्ते पार‍ितोष‍िक वितरण !

January 26, 2024

ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, ‘ईडी’ला पूर्ण सहकार्य केलं !

June 25, 2021

देवेंद्र फडणवीस यांनी दिला सेनेच्या ‘ या ‘ नेत्यांना इशारा

November 28, 2020

केंद्र सरकारचा मोठा निर्णय VLC Media Player ॲपवर घातली बंदी !

August 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group