रावेर (प्रतिनिधी) येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका गोदामातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील नारायणी सेल्स गोदामामधून २४ ते २६ मेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचा कडीकोंडा तोडून गोदामामध्ये ठेवलेले कॅडबरीचे बॉक्स, फाईव्ह स्टार चॉकलेट बॉक्स, एक मोबाईल व डीव्हीआर, वाय फाय आऊट असा ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत उज्ज्वल ओमप्रकाश अग्रवाल यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. मीरा देशमुख करत आहेत.