धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे आज सकाळी उघडकीस आले होते. या दोघं बंद घरातून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोकड लांबविल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील राजपुत मंगल कार्यालय जवळ राहणारे भगवान गोकुळसिंह बयस यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ३० हजाराची रोकड, २० ग्रॅमची मंगल पोत, ३० ग्रॅमचे किल्लू व इतर किरकोळ दागिने, ३० चांदीची नाणी असा एकूण साधारण अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती भगवान बयस यांनी दिली. तर लोहार गल्ली येथील ज्ञानेश्वर माळी यांच्या घरातून ६ ग्रॅम सोने, ९ भार चांदी आणि ५०० रोख असा एकूण साधारण ४० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
दोघंही घर मालक बाहेरगावी
दरम्यान, ज्या दोन घरांमध्ये चोरी झाली ते दोघंही घर मालक बाहेर गावाला गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद घरे टार्गेट केल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे. घटनास्थळी शिवसेनेचे सहसंपर्क गुलाबराव वाघ,भाजप गटनेते कैलास माळी आणि धीरेंद्र पुरभे यांनी भेट दिली होती.
चोरटे सराईत असल्याचे उघड !
चोरट्यांनी दोघं बंद घराचे कुलूप अगदी सहज उघडले. यावरून चोरटे सराईत असल्याचे उघड झाल्याचे आहे. चोरट्यांनी आधी श्री. महाजन यांच्या घरी चोरी केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बयस यांच्या घराकडे वळवला, हे उघड झाले आहे. कारण श्री. महाजन यांच्या घरातून चोरलेली नटबोल्डची ऐक थैली बयस यांच्या घराजवळ मिळून आली आहे. दरम्यान, भरवस्तीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोन्ही घर मालक पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यासाठी गेले होते.
















