भुसावळ (प्रतिनिधी) 2019 मध्ये आम्ही विरोधात असताना आंदोलन केल्यानंतर केळीबाबतचे निकष बदलले तेव्हा का जाग आली नाही विरोधकांना ? असा प्रश्न त्यांनी केला. कोरोनातही जनतेला घरी बसून काम करता आले ही डिजिटल इंडियाची मोदींमुळे उपलब्धी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच ही गल्लीची नव्हे तर दिल्लीची निवडणूक असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. त्या भुसावळमधील जाहीर सभेत बोलत होत्या.
जाहीर सभेत मांडला विकास कामांचा लेखाजोखा !
खासदार राक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात मंगळवारी रात्री आठ वाजता जाहीरसभा झाली. यावेळी आपल्या भाषणातून विरोधकांना चांगलेच सुनावले. विरोधक आपल्याला दहा वर्षात काय केले म्हणून विचारत आहेत मात्र, गत दहा वर्षात रस्त्यांची कनेक्टीव्हीटी वाढवली, रस्त्यांचे जाळे मजबूत केले, महिला सक्षमीकरण केले व रेल्वे स्थानकांचा विकास केला, असे भुसावळात आयोजित जाहीर सभेत खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उद्योजक मनोज बियाणी, रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील, राजेंद्र फडके, रंजना महाजन, जयप्रकाश बाविस्कर, मोहन फालक, नंदू महाजन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.