TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे’ : नारायण राणे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न साकार होत आहे. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अमित शहा प्रथमच कोकणात येत आहेत. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे’, अशा भावना नारायण राणेंनी व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पडवे-कसाल येथे सर्व सुविधांनी सज्ज असं लाइफ टाइम मेडिकल कॉलेज उभारण्यात आलं असून या कॉलेजचं उद्घाटन रविवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे’, अशा भावना व्यक्त करतच राणे यांनी याबाबत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची भक्कम साथ मिळाल्याने मी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलो. येथील जनतेचा मी नेहमीच ऋणी राहणार आहे. आपल्या जिल्ह्यासाठी सतत काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचं आरोग्य ठणठणीत राहावं आणि जिल्ह्यात डॉक्टर घडावेत म्हणून मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं स्वप्न मी पाहिलं होतं. हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, असे सांगतानाच यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सहकार्य कसं लाभलं याबाबत राणे यांनी प्रथमच भाष्य केलं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मेडिकल कॉलेजसाठी राज्य सरकारच्याही काही परवानग्या आवश्यक असतात. हे करताना कोणत्या प्रकारची आडकाठी आली का?, असे विचारले असताना राणे यांनी अशी कोणतीही आडकाठी आली नसल्याचे सांगितले. केंद्र असेल वा राज्य सरकार असेल मेडिकल कॉलेजबाबत मला कुणीही आडकाठी केली नाही. उद्धव ठाकरे यांचं मला चांगलं सहकार्य मिळालं. मेडिकल कॉलेजची फाइल परवानगीसाठी राज्य सरकारकडे आली तेव्हा मी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन केला. तुमच्याकडे माझ्या कॉलेजची फाइल आली आहे. त्यावर सही करा, अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व फाइलवर सही केली. त्यासाठी मी त्यांचे आभारही मानले, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी राजकीय वा कौटुंबिक चर्चा झाली का, असे विचारले असता सगळेच संवाद मीडियाला सांगायचे नसतात, असे सांगत राणे यांनी प्रश्नाचे उत्तर टाळले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

वीरजवान सागर धनगर यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर : अनिल जैन !

June 28, 2024

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४३ कोरोनाबाधित !

April 3, 2021

…तुमच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावू ; मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना धमकी

August 14, 2021

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group