नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात. Post Office Schemes योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला रिटर्न सुद्धा मिळतो. यापैकी अनेक योजना अशा आहेत, ज्या बँकेपेक्षा जास्त रिटर्न देतात. सोबत टॅक्समध्ये सूट सुद्धा दिली जाते. जर तुम्हाला एक सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक करायची असेल तर पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) गुंतवणूक करू शकता.
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये १ ते ५ वर्षांपर्यंत मुदत ठेव उघडू शकता. ही एक लहान बचत योजना आहे. जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत त्यांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा की जे व्याज ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत उपलब्ध होते, ते आताही मिळत राहील. पोस्ट ऑफिस मुदत ठेवींमध्ये, ६.७ टक्के व्याज ५ वर्षांसाठी देत आहेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीने ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवीमध्ये १ लाख रुपये जमा करून खाते उघडले, तर ५ वर्षानंतर, त्याला TD च्या व्याज दरानुसार १,३९,४०७ रुपये मिळतील. त्याच वेळी, एक वर्ष, २ वर्ष आणि ३ वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर वार्षिक ५.५ टक्के इतका आहे.
कोण खाते उघडू शकतो ?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणताही भारतीय स्वतः एकटा किंवा संयुक्त खाते उघडू शकतो. त्याच वेळी, ज्यांचे वय १० वर्षांपेक्षा जास्त असावे. एखादा मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीही हे खाते सुरू करू शकतो. खाते उघडण्यासाठी तुम्ही त्यात १००० रुपयांपासून कोणतीही रक्कम टाकू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस TD मध्ये ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.
Premature Closing नियम
६ महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही योजना बंद करू शकता. दुसरीकडे, तुम्ही या खात्याचे १२ महिने पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर TD बंद केल्यास, पोस्ट ऑफिस बचत योजनेचा व्याज दर लागू होईल आणि मुदत ठेवीचा नाही.
पोस्ट ऑफिस TD मधील सुविधा
- यावर तुम्हाला नामांकन सेवा मिळेल
- पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या खात्यात खाते हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल
- पोस्ट ऑफिस एक, पण एकापेक्षा जास्त टीडी खाते सुरू करू शकता
- सिंगल अकाऊंटला जॉइंट किंवा जॉइंट अकाऊंटचे सिंगल अकाऊंट करता येईल
- खाते विस्तार सुविधा
- इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा