TheClearNews.Com
Sunday, December 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

चाळीसगाव मतदारसंघातील १००० विद्यार्थ्यांना आमदार मंगेश चव्हाण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नेणार किल्ले रायगड,

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2025
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – ‘रायगड’ हा समस्त विश्वाचा अभिमानबिंदू…महाराष्ट्र आणि मराठीचा मुकूटमणी…शिवशंभोच्या शौर्याची अभेद्य पताका…म्हणूनच दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्या पूर्वीचं लाखों पावलांना ओढ लागते ती रायगडाची ! आपल्या गाव – शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगप्रवर्तक राज्यकारभाराची, रयतेच्या सेवेची मुहूर्तमेढ व्हावी. सदगूणी, निर्व्यसनी, नितिवंत व स्वाभिमानी अशी एक पिढी घडावी. हाच प्रामाणिक भाव ठेवून चाळीसगाव पंचक्रोशीतील तरुणाईसाठी ५ वर्षापूर्वी ‘तरुणाईचा ध्यास करारी…आम्ही रायगड वारकरी’ हा मंत्र घेत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रायगड मोहिमेला सुरुवात केली. यंदाही नव्या ध्यासाने ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रायगड वारीचे प्रस्थान होत आहे.

आपल्या देशाचे कणखर आर्यनमॕन गृहमंत्री मा. श्री. अमितजी शहा यांनी रायगड येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात ‘१२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रायगडचे शौर्य अनुभवावे…यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा’ असे आवाहन केले होते. त्याला कृतीशील प्रतिसाद देतांना खास चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर्षी रायगडवारीचे आयोजन केले आहे. त्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील या शैक्षणिक वर्षात ११ वी व १२ वी पास असणाऱ्या २ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित “Raigad Mohim Entrace Test 2025 (RMET) घेण्यात आली होती. त्यात प्रथम आलेल्या १००० विद्यार्थ्यांना यावर्षीच्या रायगड मोहिमेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच यंदाच्या रायगडवारीला विशेष महत्व आहे. रायगडी ९ रोजी तिथीनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा ‘याचि डोळा याचि देही’ हजारो विद्यार्थी अनुभवणार आहेत.

READ ALSO

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 21 ते 27 डिसेंबर 2025 !

विद्यार्थी मित्रांना रायगड वारीत क्षणोक्षणी शौर्य, त्याग, गनिमांचा पाडाव, सह्यगिरीच्या मनातून उठणा-या तलवार आणि समशेरींचा चित्कार..तोफांचे गगनभेदी आवाज…आसमंत चिरु पाहणा-या तुता-यांची गर्जना…मुघलांसह गो-या साहेबांच्या छातडावर पायरव करीत डौलाने फडकणा-या स्वराज्य ध्वजाची गळाभेट होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं सार्वभौमत्व जपतांना स्वराज्य निर्माण केलं. चार दशकानंतरही त्यांचे विचार आजही विश्वस्तरावर स्विकारले जातात…गौरविले जातात..त्यांचं चिरंजीवी असणं…गडकोटांसारखचं अभेद्य आहे. सह्याद्रीच्या कातळ सौदर्याने इथल्या दूर्ग – किल्ल्यांना पराक्रमाचा साज दिला.
‘शहाजीराजे म्हणजे पहाडासारखे पिता आणि जिजाऊसाहेब म्हणजे भव्य सागरासारखी माता ! या दोघांच्या पुण्याईच्या बळावर अलम दुनियेला आम्ही दाखवून देऊ; सह्याद्रीच्या विक्रमवैराग्यापुढे हिमालयाची शिखरं किती ठेंगणी आहेत ते !’ छत्रपती शिवप्रभूंचे हे बाणेदार शब्द रायगडवारीचा आत्मा आहे. विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी शिवछत्रपतींचे पाईक म्हाणून समस्त चाळीसगाववासियांनी देखील आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

९०० किमी अंतराची रायगड वारीत शिवप्रेमींचा प्रवास सुखकर व्हावा व त्यांची जेवणाची – पाण्याची आबाळ होऊ नये यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. शिवप्रेमींच्या प्रवासासाठी ४५ राज्य परिवहन महामंडळाच्या २५ नव्या कोऱ्या बसेस तसेच ५० खाजगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या चार दिवसात ५ हजाराहून अधिक व्यक्तींचे जेवण आणि नाश्ता ठिकठिकाणी चाळीसगाव येथून सोबत असणाऱ्या आचारी यांच्याकडून बनवला जाणार आहे. तसेच प्रवासात ठिकठिकाणी आणि रायगड किल्य्यावर जाताना शिवप्रेमींसाठी १ लिटरच्या १० हजार पाणी बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ असे आकर्षक टी शर्ट देखील दिले जाणार आहेत. सोबत आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून दोन रुग्णवाहिका व औषधोपचार कीट देखील असणार आहे. यासाठी जवळपास १०० हून अधिक भाजपा कार्यकर्ते / स्वयंसेवकांची यंत्रणा गेल्या महिनाभरापासून कामाला लागली आहे. या सर्व प्रवासात आमदार मंगेश चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच राहणार असून त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता शिवप्रेमींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असल्याचे दिसते.

 

दि. ७ जून ते १० जून २०२५
रायगड मोहीम वेळापत्रक

▶️ शनिवार दि.७ जून २०२५ सायंकाळी ६ वा.
– छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान (सिग्नल चौक) येथे शिवरायांची महाआरती करून रायगड मोहीम शुभारंभ

  • रात्री ८ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रस्थान व मोहिमेस सुरुवात.

▶️ रविवार दि.८ जून २०२५ सकाळी ९ वा.
* हरवंडी ता. माणगाव जि. रायगड येथील शांतीनिवास आश्रम येथे आगमन, जेवण व विश्राम.

  • सायंकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, शाहिरी पोवाडे व आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा तरुणाईशी संवाद.

  • रात्री जेवण व विश्राम.

▶️ सोमवार दि.९ जून २०२५ सकाळी ५ वा.
* किल्ले रायगड कडे प्रस्थान.

  • सकाळी ८ ते १० रायगड होळीचा माळ येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन.

  • सकाळी १० ते ११ बाजारपेठ मार्गे जगदीश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज समाधी दर्शन.

  • दुपारी ११ वा. रायगड स्वच्छता मोहीम व सर्व कचरा सोबत घेऊन रायगड उतरण्यास सुरुवात.

  • दुपारी ३ वा. रायगड पायथा येथे आपल्या बसेस जवळ जमणे व तेथून हरवंडी ता. माणगाव जि. रायगड कडे प्रस्थान.

  • सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत हरवंडी ता. माणगाव जि. रायगड येथे आगमन व जेवण आणि तात्काळ चाळीसगाव कडे मुळशी-ताम्हिणी घाट- पुणे-नगर मार्गे प्रस्थान

▶️ मंगळवार दि.१० जून २०२५ सकाळी १० वा.

  • चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन व मोहिमेची सांगता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonThis year marks the 5th year of the Raigad campaignwhich has become a model in the state...

Related Posts

चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 21 ते 27 डिसेंबर 2025 !

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 डिसेंबर 2025 !

December 20, 2025
जळगाव

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 डिसेंबर 2025 !

December 19, 2025
Next Post

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंदोलनकर्त्या प्रतिभा शिंदेंसह २०० जणांविरोधात गुन्हा !

November 7, 2020

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

January 17, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ५ मे २०२३ !

May 5, 2023

जळगावात डॉक्टरसह तिघांना मारहाण ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

October 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group