अमळनेर (प्रतिनिधी) जनतेने तीनदा नाकारले तरी पुन्हा राजकारणात उभे राहणाऱ्या माजी आमदारांना यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत जनता पुन्हा त्यांची जागा दाखवणार असून ‘घरवापसी’ पक्की असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नगरपरिषद निवडणुकीत दुसऱ्यांच्या चारित्र्यावर बोलणाऱ्या माजी आमदारांनी आधी आरश्यात पाहण्याची गरज आहे. अवैध धंद्यांतून आजवर कमाई करून अनेकांना बरबादीच्या वाटेला लावणारे हेच माजी आमदार आज नैतिकतेच्या बाता करत आहेत. पावसाळी बेडकासारखे निवडणुकीच्या वेळीच डराव डराव करणारे तसेच नंदुरबारहून अमळनेरात कधीतरी उगवणारे हे माजी आमदार — त्यांना दोन वेळा विधानसभेतून आणि एकदा पालिकेतून जनतेने नाकारले आहे.
स्वतःचे समर्थकही टिकवता न आलेले, पालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार उभा करण्यास अपयशी ठरलेले हे माजी आमदार — डुप्लिकेट धंदे करणाऱ्यांना अमळनेरकर जनता यंदा पुन्हा जागा दाखवणार आहे. रबर स्टॅम्प उमेदवाराचे ‘पार्सल’ही परत जाणार, असा टोला भागवत पाटील यांनी यावेळी लगावला.
















