मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्याचं पितळ उघड पडलं आहे. आरोपी आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. घोटाळा झालाच आहे,” असंही राऊत म्हणाले.
किरीट सोमय्यांनी कोर्टाने दिलासा मिळाल्यानंतर केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “आरोपीला तात्पुरता जामीन मिळाला आहे. अपहार १०० टक्के झाला असून आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. आरोपी भूमिगत, फरार झाले होते. खालील कोर्टाचा निकाल पाहिला तर आरोपी निर्दोष नाहीत. कसून चौकशी झाली पाहिजे, पोलीस ठाण्यात हजर झालं पाहिजे असं सांगितलं आहे. त्यांनी जास्त वचवच करु नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आपण आरोपी आहोत हे विसरु नका. तुमच्यावर आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशांचा अपहार केला आहे. टीव्हीवर येऊन मोठ्याने बोलल्याने आरोप धुवून निघत नाहीत. यापेक्षा भयंकर प्रकरणं समोर येणार आहेत”.
“जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्याचं पितळ उघड पडलं आहे. आरोपी आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. घोटाळा झालाच आहे,” असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले आहे, “ज्या परिस्थितीत अटक टाळण्याचा प्रयत्न झाला त्यावरुन एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का मिळत नाहीत? त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये? विशिष्ट पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत आहे?”.
“आरोपीने कोणत्या परिस्थितीत जामीन मिळवला याबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि इतर सामान्य लोक अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत. घोटाळा ५८ रुपयांचा असेल किंवा ५८ कोटींचा असेल…अपहार हा अपहारच असतो,” असंदेखील त्यांनी म्हटलं. आज आंबेडकरांची जयंती आहे…आज त्यांनीही अश्रू ढाळले असते असंही ते म्हणाले.