TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर, पडळकरांनी केला ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे. दरम्यान, पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाविरोधात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील नवी पेठ, शास्त्री रोड परिसरात ठिय्या आंदोलन केले आहे. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यावेळी विद्यार्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुण्यासोबतच नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूरातही विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केली. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

तसेच १ लाख विद्यार्थी MPSC च्या परीक्षेसाठी पुण्यात राहतात, दर महिन्याला ९ ते १० हजार रुपये घराचे भाडे देतात, परंतु सरकारला या विद्यार्थ्यांसाठी काही देणंघेणं नाही. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, सरकार निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही. पोलिसांनी दादागिरी करू नये असं आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा – पंकजा मुंडे

एमपीएससीची परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.

परीक्षांबाबत सरकारने नियोजन केले नाही- प्रविण दरेकर

यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर म्हणाले की, राज्य सरकार म्हणते की कोरोना काळात महाराष्ट्र काही थांबला नाही. हे केवळ बोलून चालत नाही तसे करावे लागते. कोरोना काळात नियोजन करावे लागते. एमपीएससीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने काही नियोजन केले नाही. केवळ कोरोनाचे कारण दाखवून परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत.

परीक्षा झालीच पाहिजे- रोहित पवार

याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरद्वारे ते म्हणाले की, ‘यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावे लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे.’ तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याकडे लक्ष देण्याची विनंती केली.

अचानक घेण्यात आलेला निर्णय चुकीचा- पृथ्वीराज चव्हाण

याबाबत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना आहे पण कोरोनाच्या काळात इतर परीक्षा सुद्धा होत आहेत. यूपीएससी आणि आरोग्य खात्यासह इतर परीक्षा झाल्या. मोठ्या राजकीय नेत्यांचे मोठे-मोठे कार्यक्रम होत आहेत. अशात फक्त विद्यार्थ्यांना शिक्षा देणे कारण, ते काही करू शकत नाहीत हे योग्य नाही. अचानक घेण्यात आलेला हा निर्णय चुकीचा निर्णय आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धरणगाव येथे क्रांतीज्योती सवित्रीमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोटारसायकला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

March 9, 2022

मुक्ताईनगरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा ; परस्पर विरोधी तक्रारी !

December 25, 2021

छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव ; झोपेतच कंपनीतील ६ जणांचा होरपळून मृत्यू !

December 31, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ९ जुलै २०२४ !

July 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group