पाचोरा (प्रतिनिधी) माझ्याकडून मोबाईल घे व माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी देत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात कैलास उर्फ गोलू धनराज चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अनुसूचित जातीची आहे हे माहीत असताना कैलास उर्फ गोलू धनराज चौधरी (वय १९) याने मागील दोन महिन्यांपासून पिडीतेच्या संपर्कात राहून माझ्याकडून मोबाईल घे व माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच दि. ५ जून २०२२ रोजी अल्पवयीन मुलगी व तिचे काका सुकलाल बाबुलाल अहिरे यांच्या घरी असताना कैलास याने घरात अनधिकारे प्रवेश केला व अल्पवयीन मुलीला पकडुन मनास लाज वाटेल असे कृत्य करून अल्पवयीन मुलीने आरडाओरड केली असता कैलास याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात कैलास उर्फ गोलू धनराज चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास मा. भारत काकडे हे करीत आहेत.
















