मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जानराव संजय कांडेलक (रा. कोऱ्हाळा ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९.०० ते ९.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचे घराचे शासकीय गोठ्याचे मी काम करुन देतो ग्रामसेवक माझ्या ओळखिचा आहे मी तुझे काम करुन देतो असे म्हणत होता. तसेच पीडित महिलेस जानराव कांडेलक याने अश्लील शिवीगाळ केली. हातात सुरी घेवुन घरा समोर येत पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जानराव संजय कांडेलक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ श्रावण गोंडु हे करीत आहेत.