राजापूर (वृत्तसंस्था) धमकी देणं एका ४० वर्षीय व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. व्यक्तीनं एका २५ वर्षीय महिलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral obscene videos) दिली होती. त्यामुळे संबंधित महिलेने धमकी देणाऱ्या व्यक्तीला दारू पाजून डोक्यात दगड घालून हत्या (Crushed head with stone) केली आहे. राजापूर (Rajapur) शहरातील चव्हाणवाडी परिसरात व्यक्तीची निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे.
राजेश वसंत चव्हाण असं हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो राजापूर शहरातील चव्हाणवाडी परिसरातील रहिवासी होता. मृत राजेश चव्हाण हा सलून व्यावसायिक असून सोमवारी अचानक बेपत्ता झाला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी राजेशच्या पत्नीनं राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता राजेशचं शेवटचं लोकेशन रानतळे परिसरात आढळलं.
घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपासणी केली असता, याठिकाणी राजेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांना आढळलं. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर दगडाने मारहाण केल्याच्या जखमा आढळल्या. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता मृत राजेश यानं रुकसार (२५) नावाच्या महिलेला धमकी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रुकसार उर्फ सलमान मोहंमद सलमानी (रा. उत्तर प्रदेश, सध्या राजापूर) हिला अटक केली.
व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी, नंतर दगड घालून हत्या
पोलिसांनी आरोपी रुकसारकडे चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली असून डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं म्हटलं आहे. आरोपी महिलेनं दिलेल्या जबाबानुसार, मृत राजेश यानं रुकसारला ‘तुझे अश्लील व्हिडीओ माझ्याजवळ असून ३० हजार रुपये दे, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करेल’ अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून रुकसारने राजेशच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, आरोपी महिलेनं राजेशला रानतळे परिसरात घेऊन जात त्याला भरपूर दारू पाजली. यानंतर आरोपी महिलेनं राजेशच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.