चोपडा (प्रतिनिधी) पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या तीन चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २० हजार किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
संशयित आरोपी पवन संजय साळुंखे (सुंदरगढी, चोपडा), अमोल राजेंद्र अहिरे (खडगाव, ता. चोपडा) व अल्पवयीन अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. पवन साळुंखे व अमोल अहिरे या दोघांना चोपडा न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे. दि. १२ जानेवारी रोजी शहरातील लोहाना पेट्रोलपंप येथून संजय नाना देवरे (वडजाई, धुळे) यांची दुचाकी चोरीला गेली होती. तपास पोहेकॉ शेषराव तोरे हे करीत असताना हे चोरटे सापडले आहेत.
मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व यापुर्वी घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एम. राजकुमार साहेब पोलीस अधिक्षक जळगांव यांनी वेळोवेळी गुन्हे बैठकी दरम्यान तसेच दैनंदिन आदेश देत असतात त्यांच्या आदेशान्वये व रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव यांच्या तसेच कृषीकेश रावले सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. के. के. पाटील साहेब, स. पो. नि. अजित सावळे, स.पो.नि.संतोष चव्हाण, पो.उप नि. घनशाम तांबे सहा. फौ. सुनिल पाटील, पोहेकॉ शेषराव तोरे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ दिपक विसावे, पोहेकॉ जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ शिवाजी धुमाळ, पोहेकाॅ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ प्रदिप राजपुत, पोना संतोष पारधी, पोना हेमंत कोळी, पोना प्रमोद पाटील, पोना मधुकर पवार, पोना संदिप भोई, पोना किरण गाडीलोहार, पोना ईश्वर धनगर, पोकों मिलींद सपकाळे, पोकों प्रकाश मथुरे, पोकों रविंद्र पाटील, पोकॉ प्रमोद पवार, पोकों विजय बच्छाव, पोकॉ सुमेर वाघरे, पोकों शुभम पाटील, पोकों आत्माराम अहिरे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.