नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलिसांनी एकाच दिवसात तीन ठिकाणी होणारे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांत पाच बालविवाह रोखण्यात आले आहेत.
विसरवाडी व अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गुप्त माहिती मिळाली की, विसरवाडी गावात दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबीय नियोजन करत होते. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले. विसरवाडी गावातील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह साक्री व नंदुरबार येथील तरुणांसोबत निश्चित करण्यात आला होता, परंतु विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी तेथे दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घरी जाऊन अल्पवयीन मुलींच्या कुटुंबीयांचे व त्यांच्या समाजाचे समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच दोन्ही अल्पवयीन मुलीच्या पालकांना विसरवाडी पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली. सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीतील बेटी या गावात पोलिस ठाण्यात राजेश गावीत यांनी जाऊन माहिती घेतली असता बेटी गावातील अल्पवयीन मुलीचा होराफळी गावातील पी.आर.पाटील यांनी सांगितले. तरुणासोबत विवाह निश्चित करण्यात आला होता. अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलींचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाइकांचे याबाबत समुपदेशन केले.नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलिसांनी तीन दिवसांत पाचवा बालविवाह रोखला आहे. ही कारवाई पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, संभाजी सावंत, सहायक निरिक्षक राजेश गावीत, नितीन पाटील, बेटी गावाचे पोलिस पाटील सुरेश वसावे, होराफळीचे पोलिस पाटील दारासिंग वळवी यांनी केली.