TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

येथीलअजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समीतीच्या बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस.आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समीतीचे सदस्य प्रशांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, दत्तु ठाकूर, पाचोरा, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मालेगाव महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे व नाशिक, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी यांचेसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या तीन आवर्तनामुळे रब्बी हंगामास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून गिरणा प्रकल्पामुळे 23905 तर पांझण प्रकल्पामुळे 3642 असे एकूण 27 हजार 544 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. शेतकऱ्यांना गव्हाणी पेरणी करावयाची असल्याने पहिले आवर्तन तातडीने सोडण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे पाटबंधारे विभागाने येत्या 5 डिसेबरला पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीला मोठी मदत होणार आहे. तर त्यानंतर पुढील आवश्यकता लक्षात घेऊन दोन आवर्तन सोडावे असा आग्रह पालकमंत्री यांनी घेतल्याने याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरणार

गिरणा धरण सलग दुसऱ्यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय पालकमंत्री यांनी घेतला. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणावर एकूण 69 हजार 350 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील 57 हजार 209 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

तर गिरणा धरणातून मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा नगरपालिका, मजीप्राच्या 2 योजना यात मालेगाव तालुक्यातील 25 गावे व नांदगाव तालुक्यातील 56 खेडी योजना त्याचबरोबर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल तालुक्यातील 154 गावांना पिण्यासाठी पाणी पुरविण्यात येते. यानुसार हे पाणी वगळून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याबाबत तसेच सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली व थकबाकीबाबतही बैठकीत चर्चा झाली.

गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवानी रब्बी हंगामासाठी पाणी हवे असल्यास तत्काळ त्या त्या शाखांकडे फार्म भरण्याबाबत सहकार्य करावे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करता येईल. असे आवाहन धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे जळगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ७४ कोरोनाबाधित ; ४३ रुग्ण निगेटिव्ह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे क्रांतीज्योती सवित्रीमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

March 11, 2021

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

November 10, 2021

अदानी वादावर संसदेत विरोधक आक्रमक ; चर्चेची मागणी करताच दोन्ही सभागृह तहकूब !

February 2, 2023

नेरी नाका स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियासाठीचे सर्व कठडे लवकरात लवकर दुरुस्त केले जाणार : महापौर महाजन

January 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group