श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-कश्मीरच्या शोपियांमध्ये गुरुवारी रात्री सुरक्षादलाने काही दहशतवाद्यांना घेरले. सकाळपर्यंत सुरू असलेल्या चकमकीमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर दुसरीकडे बडगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद झाले आहेत. येथे शुक्रवारी सकाळी जवळपास ६ वाजता सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर दुसरीकडे बडगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील बीरवाहमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर पोलीसचे एसपीओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले आहेत. तसेच एक जवान देखील जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. आणखी एक-दोन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाम चकमकीत जखमी झालेल्या एसजी सीटीचं नाव मंजूर अहमद असं आहे. सध्या त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
गुरुवारी सैन्य आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. ही शस्त्रे जम्मूच्या रियासी जिल्ह्याच्या जंगलात लपवली होती. जिल्ह्यातील मक्खिदारच्या घनदाट जंगलांमध्ये संशयास्पद कारवायांबाबत बुधवारी सायंकाळी इनपुट प्राप्त झाल्याचे सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, पीर पंजाल रेंजच्या दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.