TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जालन्यात रक्तरंजित थरार, भरदिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) शहरातील मंठा चौफुली या गजबजलेल्या परिसरात आज सोमवारी (दि.११) भरदुपारी गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या थरारक घटनेमुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन मच्छिन्द्र तौर (वय ३२, रा. जालना) असे खून झालेल्या या तरुणाचे नाव आहे.

डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषीत !
अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत तौर यांना खाजगी रूग्णालयात नेण्यात आले, परंतू डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. परंतू जालन्यात इनकॅमेरा शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.११) दुपारी दीड वाजेच्या सुमारास मंठा चौफुली परीसरातील होंडा शोरूमजवळ घडली. दरम्यान, मौजपुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले तर दोघे फरार झाले आहेत. लक्ष्मण गोरे (रा. खरपुडी) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत तरूणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

एक गोळी डोक्यात एक घुसली पोटात !
मयत गजानन तौर हे चारचाकी वाहनातून रामनगर कारखान्याकडून जालन्याकडे येत होते. जालन्यात मंठा चौफुली परीसरातील वाहनाच्या शोरूमजवळ संशयीत हल्लेखोर हे अगोदरपासूनच थांबलेले होते. ते ओळखीचेच असल्याने त्यांना पाहून मयत तौर यांनी गाडी थांबवली. गाडीतून उतरून तौर हे हल्लेखोरांच्या दिशेने जात असताना तिघांनी त्यांच्याकडे असलेल्या गावठी पिस्तुलातून तौर यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक गोळी थेट डोक्यात व एक पोटात घुसल्याने तौर हे जागीच कोसळले.

हल्लेखोर पसार !
गोळीबार करून हल्लेखोर रामनगर कारखान्याच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकूही जप्त केला. गंभीर जखमी तौर यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतू डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केल्याने मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. याठिकाणी मोठा जमाव जमल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, इनकॅमेरा शवविच्छेदनाची जालन्यात सुविधा नसल्याने तौर यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात रवाना करण्यात आला होता.

पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात !
गजानन तौर यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर रामनगर कारखान्याच्या दिशेने फरार झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौजपुरी पोलिसांना माहिती देवून नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या व स्थानिक गुन्हे शाखेची टीम रामनगरकडे निघाली. इकडे मौजपुरीचे सपो निरीक्षक मिथून घुगे, पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, पंकज बाजड आदींनी रामनगरजवळ नाकाबंदी लावली, परंतू हल्लेखोरांची स्विफ्ट डिझायर कार नाकाबंदी चुकवून पुढे निघाल्याने मौजपुरी पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला, सदर कार परत रामनगरकडे येत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार खड्ड्यात कोसळली, परंतू पोलिस पाठलाग करीत असल्याने तिघांपैकी दोघांनी पळ काढला तर एक पोलिसांच्या हाती लागला. लक्ष्मण गोरे (रा. खरपुडी) असे त्याचे नाव असून गुन्ह्यात वापर झालेली स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम.एच.४३ ए.एल. ५४४८) ही जप्त करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

जळगाव बांधकाम विभागात राडा? ; तलवार, पिस्तुल निघाल्याची चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास !

July 15, 2023

भुसावळ मार्गावर रोडचे रुंदीकरण नियमाप्रमाणेच करावे ; राष्ट्रवादीचे नितीन गडकरींना निवेदन !

November 15, 2021

‘मी पणाने राष्ट्र तयार होत नाही’ : जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (व्हीडीओ)

December 7, 2021

आरोग्य भरती घोटाळ्यातही विजय दर्जीला अटक ; न्यायालयीन कोठडीत रवानगी !

June 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group