भडगाव (प्रतिनिधी) दहावीतल्या विद्यार्थ्याकडून नात्यातीलच एका ३ वर्षीय मुलीचे लैगिक शोषण केल्याची संतापजनक घटना भडगाव तालुक्यातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर भडगाव पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेत अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले. पिडीत मुलगी घरी रडत आल्यानंतर तिने आईला हकीगत सांगितली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.