छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) गावठी कट्ट्याचा वापर करून महापालिकेच्या सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास पुंडलिकनगरात घडली. मात्र, सुदैवाने ऐनवेळी डोके खाली केल्याने कर्मचारी थोडक्यात बचावला. प्रभू आनंद आहिरे (५९) असे निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर गोळीबाराचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगर गल्ली क्रमांक पाच येथे ही घटना घडली. प्रभू आनंद आहिरे हे महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. दोन तरुण सोमवारी (दि. ३१) दुपारी ४.४० वाजता अचानक आहिरे यांच्या घरात घुसले व आहिरे यांना काही कळायच्या आत त्यांच्यापैकी एकाने गावठी पिस्तूल काढत थेट आहिरे यांच्या दिशेने रोखले. पिस्तूल पाहून आहिरे प्रचंड घाबरले. तरुणाने आहिरे यांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, याचवेळी त्यांनी डोके खाली केल्याने गोळी भिंतीला जाऊन लागली. त्यानंतर दोन्ही तरुण त्वरित तेथून निघून गेले. विशेष म्हणजे, हल्लेखोर चालत आले गोळीबारनंतरही शांततेत चालतच पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओच्या आधारे त्यांचा शोध प्रभाकर आहिरे हे दीड ते दोन महिन्यांपूर्वीच हनुमाननगर येथे राहण्यासाठी आले होते. त्याआधी त्यांच्या जागी दुसरे भाडेकरू राहत होते. त्या भाडेकरूचा घरगुती वाद होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या वादातून दोन तरुणांनी येऊन गावठी कट्ट्यातून गोळीबार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज असून तपास सुरू आहे.
या इमारतीत नऊ भाडेकरू राहतात. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास आलेल्या हल्लेखोरांना अहिरे यांची खोली माहीत होती. दोघांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. टोपी घातलेल्या त्याचा साथीदार जिन्यात उभा होता. गोळीबार होताच प्रवेशानंतर साथीदार पुढे निघून गेला तर हल्लेखोर नंतर पडत त्याच्या मागे निवांत पायी गेला.