TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीपनगर वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक ; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जोरदार आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पात कामगारांना ३ ते ४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे. त्यात आता एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज दीपनगर (Deepnagar Power Project) प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करून मृत कर्मचाऱ्याच्या परिवारास भरपाईची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्याने कर्मचारी संतप्त झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दीपनगर प्रकल्पात विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आधीच कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन सुरु असताना एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजता नवीन ६६० प्रकल्पाच्या गेटवर आंदोलकांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले होते. दीपनगर प्रकल्पातील कर्मचारी शैलेंद्र यादव (वय ३४, मूळ रा. बिहार) हा इंडवेल कंपनीत काम करीत होता. आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह बिहारकडे रवाना करण्यात आला. मात्र, नियमानुसार या कर्मचाऱ्याच्या वारसाला सर्व भरपाई देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

दीपनगरात कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे तसेच कर्मचारी सुरक्षिततेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास योग्य ती भरपाई द्यावी, तसेच अन्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह पुन्हा आणावा म्हणून कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. चार तास उलटूनही अधिकारी न आल्याने कामगार अधिकच संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी किरकोळ दगडफेक करत, वाहनेही फेकण्यात आली.

त्या कंपनीचा हा कामगार होता – भेल जनरल मॅनेजर संजय गोस्वामी

भेलचे जनरल मॅनेजर यांना घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, भेल कंपनीने बॉयलर बनवण्याचा सब कॉन्ट्रॅक्ट इंडवेल कंपनीला दिला आहे. या कंपनीने बॉयलर बनवण्यासाठी सुद्धा पेटी कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिला असून त्या कंपनीचा हा कामगार होता. काल रात्री त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते. तसेच कामगारांचा मृतदेह त्याच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पगार होत नसल्याच्या आरोपवर ते म्हणाले की, दर महिन्याला नियमित पगार होतात, आम्ही सर्व कागदपत्र बघितल्यानंतर कंपन्यांना पैसे देतो. आतमध्ये येण्याची परवानगी ही महाजनको देते. त्यांनी पास दिल्यानंतरच सर्व कामगार व ठेकेदार काम करण्यासाठी आतमध्ये येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्याकडे पैसे नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्यास त्यावर ते म्हणाले की, याची सर्व चौकशी आम्ही करीत आहोत.

सर्व कामगारांचे पगार झालेले आहेत – मुख्य अभियंता विवेक रोकडे

यापूर्वी २३ तारखेला गेटवर एक बैठक झाली होती. त्यामध्ये चर्चेनंतर असे ठरले होते की. यापुढे सर्व पगार नियमित होतील आणि सर्व कामगारांचे पगार झालेले आहेत. कोरोनामुळे या सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पाच्या कामाला उशीर होत आहे. याकरता केंद्र सरकारने पूर्वी सहा महिनेनंतर तीन महिने असा एकूण नऊ महिन्याचा अवधी वाढवून दिल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
Next Post

अभाविपतर्फे जिल्हाभरात माईंना भावपूर्ण श्रध्दांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२३ !

September 13, 2023

अँड. जमील देशपांडे यांची पाळधी ग्राम पंचायतच्या “माझी वसुंधरा” योजनेच्या अध्यक्षपदी निवड !

September 15, 2021

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

December 8, 2023

जळगाव जिल्हयात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करावे : आ एकनाथराव खडसे

July 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group