TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

सशस्त्र सेना ध्वजन‍िधी संकलन २०२३ चा शुभारंभ ; शहीद जवानांच्या वीर पत्नी, माता व पिता यांचा सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ज‍िल्ह्यातील माजी सैन‍िकांचे ज‍िल्हा प्रशासनाकडे असलेले प्रलंब‍ित प्रश्न, तक्रारी व समस्या सोडव‍िण्यासाठी तीन मह‍िन्यातून एक द‍िवस माजी सैन‍िक द‍िवस साजरा करण्यात येईल. सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे. अशी ग्वाही ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे द‍िली.

जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजद‍िना (७ ड‍िसेंबर) न‍िम‍ित्त आयोज‍ित कार्यक्रमात ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद बोलत होते. याप्रसंगी ज‍िल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर ज‍िल्हाध‍िकारी अंकुश प‍िनाटे, न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी तथा ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी सोपान कासार,सहायक ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी संजय गायकवाड, माजी सैन‍िक द‍िनकर पवार आदी मान्यवर उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थ‍ित मान्यवरांच्या हस्ते ध्वजन‍िधी संकलन २०२३ चा शुभारंभ करण्यात आला.

READ ALSO

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

‍ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद म्हणाले, मागील काही मह‍िन्यात जळगाव ज‍िल्हा व‍िव‍िध उपक्रमांच्या अंमलबजावणीत राज्यात पह‍िला व दुसरा क्रमांकावर राह‍िला आहे. ध्वजन‍िधी संकलनात ही ज‍िल्ह्याने उल्लेखनीय कामग‍िरी केली आहे. माजी सै‍न‍िकांच्या प्रलंब‍ित मुद्यांची यादी तयार करून आपण प्रत्येक मुद्दा न‍ियमांच्या चौकटीत सोडव‍िण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी सैन‍िकांसाठीच्या स्वतंत्र कॉलनीची मागणी होत आहे. ज‍िल्ह्यातील काही तालुक्यात ड‍िफेन्स कॉलनी स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे. अशी अपेक्षा ही ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.

शंभर टक्के ध्वज न‍िधी संकल‍ित करणारा जळगाव राज्यातील पह‍िला ज‍िल्हा

ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी श्री.कासार आपल्या प्रास्ताव‍िकात म्हणाले की, ध्वजन‍िधी संकलनाचे द‍िलेले उद्द‍िष्टानुसार शंभर टक्के ध्वज न‍िधी संकल‍ित करणारा जळगाव राज्यातील ज‍िल्हा ठरला आहे. शासनाकडून २०२२ मध्ये ज‍िल्ह्यासाठी १ कोटी १८ लाख १२ हजार ४०० रूपयांचे उद्द‍िष्ट देण्यात आले होते. या उद्द‍िष्टापैकी १ कोटी ४५ लाख ७१ हजार ८८२ रूपये इतके असे एकूण १२३.३६ टक्के उद्दिष्ट ज‍िल्ह्याने पूर्ण केले आहे. २०२३ साठी ज‍िल्ह्याला १ कोटी १८ लाख ०१ हजार ४०० रूपयांचे उद‍िष्ट देण्यात आले आहे. ज‍िल्हा सैन‍िक कल्याण कार्यालयाच्या वतीने २०२२ या वर्षात २९४ लाभार्थ्यांना ३७ लाख ७० हजार ५५८ रूपयांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ज‍िल्ह्यात आजपर्यंत शहीद झालेल्या १९ जवानांचे पत्नी, माता व पिता यांचा सत्कार करण्यात आला. व‍िव‍िध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैन‍िकांच्या पाल्य कु.चेतना गणेश मराठे, कु.महाजन ग्रिष्मा दगाजी, कु.पाटील मानशी शांतराम यांना व‍िशेष गौरव पुरस्कार देऊन गौरव‍िण्यात आले. यावेळी ध्वजन‍िधी संकलनात शंभर टक्के उद‍िष्ट पूर्ण करणाऱ्या शासकीय कार्यालयातील प्रमुख म्हणून उपव‍िभागीय अध‍िकारी, तहसीलदार, गटव‍िकास अध‍िकारी व शासकीय व‍िभागाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ‍कल्याण संघटक न‍ितीन पाटील यांनी केले. आभार सहाय्यक ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी संजय गायकवाड यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
Next Post

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा विकासकामांचा धडाका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यावरील गोळीबार प्रकरण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल, दोघं ताब्यात !

July 26, 2021

राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक ठाऊक आहे का? : विजय रूपाणी

December 9, 2020

जळगावसह तालुक्यातील युवक मंडळ, संस्था नेहरू युवा केंद्राशी करावे संलग्नित

November 23, 2020

वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न

March 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group