जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज अवघे ४९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज ५९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झालाय.
जळगाव शहर –१५, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ- ११, अमळनेर- ००, चोपडा-००, पाचोरा-०३, भडगाव-०२, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-०१, जामनेर-०३,रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-०४, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ४९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ८९१ पर्यंत पोहचली असून ५२ हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ३६९ रुग्ण सध्या उपचार घेताय.