मेष: तुम्हाला सावध राहून काम करावे लागणार आहे. आज धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विविध लाभ होतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आज तुमच्या सहकाऱ्यांकडून विश्वासघाताला सामोरे जावे लागेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : भावांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर मनापासून करा. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसन्मानाचे योग येणार आहेत. आजचा दिवस चांगली बातमी देणारा असेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. सार्वजनिक कामात सहभाग वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
मिथुन : भविष्याचील कोणत्याही योजना बिघडतील. राजकारणाशी संबंधित लोकांना समाजसेवेची संधी मिळेल.कामाचा ताण कमी होईल. उमेद वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज काम करणाऱ्यांना गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी समस्या सोडवतील. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहाल. तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक कामांना गती मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. आज तुमच्या जोडीदाराच्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
सिंह : खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते पूर्ण होईल. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. काम बिघडू शकते. तुमचे मन प्रसन्न राहिल. तुमच्या कामांना अनुकूलता लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे.
कन्या : व्यावसायिक लोकांच्या कामात काही कारणास्तव काही अडथळे येत असतील तर आज तुमच्या भावांच्या मदतीने तेही दूर होतील. मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक खर्च होतील. तुम्ही आपल्या कामांचे नियोजन करु शकणार नाहीत. नात्यात कटूता येईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल राहील. प्रवास आज नकोत.
तुळ : आज व्यवसायाच्या संदर्भात बाहेर जाल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर निर्णय जपून घ्या. काहींना विविध लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल अधिक जागरुक राहायला हवे. पालकांचे सहकार्य मिळेल.तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल.
वृश्चिक : आज घरात आणि व्यवसायात काही वादात अडकणे टाळा. तुम्हाला मुख्य कामांना महत्त्व द्यावे लागेल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी आज कमी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादाला सामोरे जावे लागेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
धनु : फायद्यासाठी केलेल्या कामात तुमचे नुकसान होईल. कौटुंबिक वादामुळे तुम्हाला त्रास होईल.तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात नवीनता येईल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : आज तुमच्या आवडीचे काम कराल. भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. वादविवादात सहभाग टाळावा. आपले मनोबल कमी असणार आहे. आज काही काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. अडचणी जाणवतील.
कुंभ : जोडीदार तुमच्यावर रागवेल. त्यांना समजवण्याचा प्रयत्न कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आज तुमचा सर्वत्र आत्मविश्वासपूर्वक वावर असणार आहे. आज तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. आपली मते व आपले विचार स्पष्ट असणार आहेत. प्रवास होतील.
मीन : योजनांमुळे भविष्यात फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. तुमच्यावर कसलेतरी अनावश्यक दडपण राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल. एखादी चिंता सतावेल. अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल.