मेष : कामात यश मिळेल आणि गुप्त मार्गांनी पैसा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि चांगले खा. अतिउत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.
वृषभ : तुमचे खर्च वाढतील, यासाठी तुम्हाला पैशाचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील आणि तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : वैवाहिक जीवनातील तणावाच्या दरम्यान, प्रेमात गोडवा राहील, ज्यामुळे तुमच्या नात्यात जवळीक वाढेल. प्रेम जीवनामध्ये असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.
कर्क : तुमचे नशीब कमजोर असल्याने तुमचे महत्त्वाचे काम बिघडू शकते. सर्वांशी चांगले वागणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.
सिंह : आरामात दिवस घालवाल. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.
कन्या : आजचा दिवस कामाच्या ठिकाणी खूप अनुकूलता आणेल. तुम्ही खूप उत्साही मूडमध्ये असाल आणि तुमच्या कामात यशही मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता किंवा चित्रपट पाहू शकता. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
तूळ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मित्र आणि नातेवाईकांशी सुसंवाद वाढेल. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांशी चांगले वागले तर कार्यक्षेत्रात यश मिळेल. प्रेमाच्या बाबतीत दिवस संमिश्र जाणार आहे. दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका.
वृश्चिक : कुठेतरी अडकलेला पैसा परत येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला धीर मिळेल आणि नवीन काम सुरू करण्याचा विचार होईल. तुम्हाला तुमच्या सासरकडून काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.
धनू : वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले होईल. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मकर : जास्त कामामुळे आरोग्य बिघडू शकते, तसेच तुम्ही मानसिक तणावात राहाल. तुमचे खर्च जास्त असतील आणि उत्पन्न त्यांच्यापेक्षा थोडे कमी असेल. जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी तुमची प्रकृती सुधारू लागेल. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.
कुंभ : रोजच्या व्यापाऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास यश देईल आणि व्यवसायाच्या ऑर्डर देखील प्राप्त होतील. काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.
मीन : वडिलांची तब्येत बिघडू शकते पण तुमच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागेल. कौटुंबिक जीवनात अनुकूल काळ जाईल.व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.