मेष : तुमच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये नोकरदार लोकांना नवीन अधिकार मिळतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आज तुम्हाला व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतरही कमी नफा मिळेल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आनंदी राहणार आहात.
वृषभ : पालकांची मदत घ्याल. कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर काही पैसे खर्च कराल. जिद्द वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. अनुकूलता प्राप्त होईल. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करा. शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवेल. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल.
मिथुन : कोणाकडून कर्ज घेतले असेल तर परतफेड करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक कामात अनुकूलता प्राप्त होईल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. आज पार्टनरशीपमध्ये केलेल्या व्यवसायात नफा मिळेल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. काहींना गुप्तवार्ता समजतील.
कर्क : शुभ समारंभात सहभागी व्हाल. प्रभावशाली लोकांना भेटाल. दिखाऊपणावर पैसे खर्च करणे टाळा. आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
सिंह : नात्यात प्रेम वाढेल. दुसऱ्याचे ऐकल्याने नुकसान होईल. टीमवर्कने काम करण्याची संधी मिळेल. मानसिक अस्वस्थता वाढेल. नकारात्मक अनुभव येतील. टीमच्या मदतीने कामे पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा ठेवा. कामे रखडणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. मनोबल उत्तम राहील.
कन्या : मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल. आईबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढेल. सभोवतालचे वातावरण प्रसन्न होईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आनंदी राहणार आहात. जुने मित्र मैत्रिणी भेटतील. आज कलात्मक काम करण्याची रुची वाढेल. आर्थिक सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
तुळ : अचानक व्यवसायातून लाभ होईल. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. सहकाऱ्यांसाठी पार्टी आयोजित कराल. व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. कामाचा ताण कमी होईल. आज व्यवसायात एखादी डील फायनल होईल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घर आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. नवीन सुसंधी लाभेल. आज जे काम कराल त्यातून फायदा होईल. तुमचा आदर वाढेल. कामाचा ताण कमी असणार आहे. काहींना नातेवाईक भेटतील.
धनु : जोडीदारासोबत शॉपिंगला जाल. तुमचे काही पैसे खर्च होतील. घरी पाहुणे येतील. चिंता सतावेल. कसली न कसली नकारात्मकता राहील. कामाचा ताण राहील. आज जुन्या कर्जातून मुक्त व्हाल. तुम्हाला कामात मेहनत करावी लागेल. मानसिक अस्वस्थतेमुळे कामात लक्ष लागणार नाही. मनोबल कायम ठेवावे.
मकर : पैसे परत मिळण्याची फार कमी शक्यता आहे. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. उत्साही रहाल. उमेदीने कार्यरत राहून कामे यशस्वी कराल. मानसिक प्रसन्नता राहील. आज पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढणार आहे. प्रसन्नता राहील.
कुंभ : विरोधत राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करतील. बोलण्यात गोडवा ठेवा. लोकांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. वेळ व पैसा वाया जाईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. आज राजकीय दृष्टिकोनातून दिवस चांगला असेल. वाहने जपून चालवावित. आर्थिक कामात सावधानता हवी.
मीन : सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल. मुलांच्या शिक्षणातील समस्या दूर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज गुंतवणुकीतून लाभ होईल. काहींना आर्थिक कामात सुयश लाभेल. प्रियजनांशी सुसंवाद साधाल.