मेष राशी :-गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. भविष्यात तुम्हाला फायदे होतील. हातून धार्मिक कार्य घडले. दिवस चांगला जाईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. मतभेद चर्चेतून सोडवणे हिताचे. आजचा शुभ रंग – किरमिजी
वृषभ राशी :- पैशाच्या बाबतीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कठीण असेल. रखडलेली रक्कम मिळविण्यात अडचणी येतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन करून काम करणे हिताचे. आजचा शुभ रंग – आकाशी
मिथुन राशी :- मुलांच्या भविष्याविषयी चर्चा कराल. पालकांशी महत्त्वाच्या विषयावर बोलाल. जोडीदाराचा सल्ला घ्याल. कष्टांना पर्याय नाही. नियोजन करून काम करा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – पोपटी
कर्क राशी :- मोठ्यांच्या मदतीने काही समस्या सोडवाल. कामात सहकाऱ्यांशी वाद होतील. तुमचा मूड खराब असेल. रागाला आवर घालणे. जपून शब्द वापरणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. आजचा शुभ रंग – पांढरा
सिंह राशी :- कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. आत्मप्रौढी टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन करून कामं करा. आर्थिक नियोजन हिताचे. आजचा शुभ रंग – गुलाबी
कन्या राशी :- मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. नात्यात तणाव निर्माण होईल. प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. आत्मप्रौढी टाळा. आजचा शुभ रंग – पोपटी
तूळ राशी :- सरकारी वादात आज यश मिळेल. कुटुंबातील सदस्य पार्टीचे आयोजन करु शकतात. आर्थिक नियोजन लाभाचे. शब्द विचारपूर्वक वापरणे फायद्याचे. कोणावरही जास्त विसंबून राहणे टाळावे. प्रसंगी इतरांच्या आनंदाचा विचार करा. आजचा शुभ रंग – निळा
वृश्चिक राशी :- निर्णयातून भविष्यात फायदा होईल. भावांमधील तणाव आज संपेल. कर्ज घेऊ नका, संकटात सापडाल. गोड बोला आणि वाद टाळा. दिवस चांगला जाईल. कायदा पाळा. आजचा शुभ रंग – लाल
धनु राशी :- बोलण्यात गोडवा कायम ठेवावा. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. नियोजन हिताचे. चर्चेतून प्रश्न सुटतील. हुशारीने काम कराल. प्रभाव पाडाल. दिवस चांगला आहे.आजचा शुभ रंग – सोनेरी
मकर राशी :- कामात वातावरण चांगले असेल. महत्त्वाचे काम पुढे ढकलू नका. अडचणीत सापडू शकता. डोकं शांत ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून वागा. बुद्धीचा वापर करा. दिवस चांगला आहे. निर्णय विचाराने घ्या पण घाई टाळा. भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखा.आजचा शुभ रंग – काळा
कुंभ राशी :- अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. प्रवासाचा आणि मनोरंजनाचा योग आहे. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – राखाडी
मीन राशी :- काही नवीन प्रयोग केल्यास नक्की फायदा होईल. भविष्यातसंबंधित महत्त्वाचा निर्णय घ्याल. पालकांचा सल्ला घ्या. हुशारीने वागून इतरांचे सहकार्य मिळवाल. कामं पूर्ण होतील. संधीचा वापर करणे हिताचे. दिवस प्रगतीचा आहे. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. पण यश डोक्यात जाणार नाही हे पहा. आजचा शुभ रंग – पिवळा