मेष : कौटुंबिक खर्चात वाढ झाल्याने मानसिक दडपण येईल. तुम्हाला थोडी चिंता सतावेल. व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा.काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. मनोबल कमी होईल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील प्रवास शक्यतो आज नकोत.
वृषभ : भावंडांचा सल्ला घ्या. काही नवीन काम सुरु करायचे असेल तर आजचा दिवस चांगला असेल. कामे यशस्वी होणार आहेत. बौद्धिक व वैचारिक प्रगल्भता लाभणार आहे. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. आज व्यावसायिकांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. ज्यासाठी पैसे खर्च होतील. आनंदी रहाणार आहात. प्रवास होईल.
मिथुन : नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर नफा मिळेल. आज तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. कामाचा ताण कमी असणार आहे. आज तुम्हाला मुलांच्या कृतीतून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
कर्क: तुमचा सन्मान वाढेल. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी प्रभावी कामगिरी करु शकणार आहात. मनोबल वाढेल. आज सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. कामे यशस्वी होतील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.
सिंह : तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. नोकरी आणि व्यवसायात विरोधकांपासून सावध राहा. महत्त्वाची आर्थिक कामे आज आपण पूर्ण करु शकणार आहात. मानसिकता सकारात्मक राहील. आज तुमचे सुखसोयींवर पैसे खर्च केल्याने मन प्रसन्न राहिल. आनंदी राहणार आहात. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
कन्या : एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांशी मतभेद होतील. बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. आरोग्य उत्तम राहील. कालपासून जाणवत असणारी चिंता कमी होईल. वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील. प्रवासातून आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करणार आहात.
तुळ : कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. जोडीदार तुमच्यावर रागवू शकतो. जोडीदाराला मनवण्याचा प्रयत्न कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आज तुम्हाला मित्राच्या समस्या सोडवण्यात व्यस्त असाल. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावित. अनावश्यक खर्च टाळावेत.