मेष : आज पूर्ण सहाकर्य मिळेल. मुलांना परीक्षेत यश मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. तुमचा आदर वाढेल. काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. मनोबल कमी होईल. आज तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील प्रवास शक्यतो आज नकोत.
वृषभ : नोकरीसाठी काम करणाऱ्यांच्या प्रयत्नाना यश मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. कामे यशस्वी होणार आहेत. बौद्धिक व वैचारिक प्रगल्भता लाभणार आहे. आज व्यवसायात यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. आनंदी रहाणार आहात. प्रवास होईल.
मिथुन : विचारपूर्वक निर्णय घ्या. भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आज तुमचे मन अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहे. कामाचा ताण कमी असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात कोणातही करार अंतिम करावा लागेल. व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
कर्क: नोकरी करणाऱ्यांना कामात नवीन संधी मिळतील. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी प्रभावी कामगिरी करु शकणार आहात. आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यात व्यस्त असाल. मनोबल वाढेल. कामे यशस्वी होतील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.
सिंह : बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. तुमचा आदर वाढेल. स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असाल तर त्यात यश मिळेल. महत्त्वाची आर्थिक कामे आज आपण पूर्ण करु शकणार आहात. मानसिकता सकारात्मक राहील. आज तुम्हाला व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. आनंदी राहणार आहात. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
कन्या : तुमचा आळस दूर करुन कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात प्रगती करु शकाल. आरोग्य उत्तम राहील. कालपासून जाणवत असणारी चिंता कमी होईल. आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रयत्न केल्यावर यश मिळेल. प्रवासातून आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करणार आहात.
तुळ : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या प्रस्तावास मान्यता मिळेल. कुटुंबात आनंद वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहिल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. वाहने सावकाश चालवावित. अनावश्यक खर्च टाळावेत.
वृश्चिक : ज्येष्ठ सदस्यांच्या मदतीने काम पूर्ण होईल. मुलाला सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. काहींना नवीन सहकारी मिळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. आजचा दिवस गोंधळाचा असेल. कुटुंबातील कलह पुन्हा डोकेवर काढेल. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.
धनु : पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी व व्यवसायात तुमचा प्रभाव राहील. आज तुम्ही कोणतेही काम करत असाल तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचा सर्वत्र दबदबा राहील. आरोग्य उत्तम राहील.
मकर : सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांच्या काही गोष्टींमुळे निराश व्हाल. जोडीदारासोबत काही वाद सुरु असेल तर संपेल. मानसिक अस्वस्थता संपेल. रखडलेली कामे पूर्ण करु शकणार आहात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काम करावे लागेल. आरोग्य सुधारेल. नकरात्मकता जाईल.
कुंभ : सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. आज तुमच्या नोकरीत काही नवीन विरोधक निर्माण होतील. काहींना अनावश्यक चिंता सतावणार आहेत. मनोबल कमी राहील. वादविवादात सहभाग टाळावा. आज तुम्ही कोणालाही पैसे उधार देणे टाळा, पैसे अडकू शकतात. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.
मीन : कौटुंबिक जीवनात काही अडथळे येतील. धार्मिक क्षेत्रात प्रवास अनुकूल राहिल. आज तुमचे मनोबल वाढणार आहे. दैनंदिन कामात समाधान लाभणार आहे. आज तुम्ही खूप व्यस्त असाल. कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे. तुमचा प्रभाव राहील.