मेष : जोडीदाराच्या वागण्यामुळे तुमची चिंता वाढेल. व्यवसायातील प्रगती पाहून समाधानी व्हाल. आज आपण आपली दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवेल. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहील. नोकरदारांना ऑफिसमध्ये कडक शिस्तीने वागावे लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील.
वृषभ : वरिष्ठांचा सल्ला जरुर घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने सावकाश व जपून चालवावीत. रखडलेले काम पूर्ण होईल. सामाजिक क्षेत्रात तुमची कीर्ती पसरेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. व्यापार-व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल.
मिथुन : समाजातील लोकांकडून मानसन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामांवर पैसे खर्च करावे लागतील. दुपारनंतर काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. प्रवास नकोत. महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आज नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. त्यासाठी अधिकाऱ्यांना खुश ठेवावे लागेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च होणार आहेत. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल.
कर्क : तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा प्राप्त कराल. आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींचा बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आज तुम्ही थोडे चिंतेत असाल. त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. आरोग्य उत्तम राहणार आहे. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल.
सिंह : आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणतेही सरकारी काम दीर्घकाळापासून रखडलेले असेल ते पूर्ण होऊ शकते. तुम्ही आपली कामे पूर्ण करणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मुलाच्या भविष्याशी संबंधित निर्णय घ्याल. मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोबल उत्तम राहील. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपारनंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्य नरम गरम राहील.
कन्या : व्यवसायासाठी लांबचा प्रवास कराल. मुलाच्या विवाहातील अडथळे दूर होतील. तुम्हाला चांगली संधी मिळेल. आर्थिक कामाचा ताण कमी होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. प्रवासाचे योग संभवतात. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमची प्रगती पाहून शत्रूंना हेवा वाटेल. चिकाटीने कार्यरत राहाल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक, मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल.
तुळ : सासरच्या बाजूने आर्थिक लाभ होतील. आईसोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात तुम्ही कागदपत्रे तपासून घ्या. दुपारनंतर अनपेक्षितपणे धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल. मनोबल वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळं निर्णय घेणं अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत.
वृश्चिक : परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. मुलांना चांगले काम करताना पाहून आनंद होईल. दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल चांगले ठेवावे. आजचा दिवस तुमच्यासाठी सावध राहाण्याचा आहे. तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल.
धनु : भीतीमुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नोकरदार लोकांना कामात आज तणाव जाणवेल. आज काहींची चिडचिड होणार आहे. दुपारनंतर एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात फायद्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल. दुपारनंतर तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे. आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल.
मकर : सरकारी कामात सक्रिय राहा. कुटुंबातील सदस्यांसोबत देवदर्शनाला जाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल जाणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. महत्वाची कामे होतील. आज काही महत्त्वाची माहिती मिळेल. ज्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल.
कुंभ : व्यवसायात काही अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. आईची तब्येत बिघडू शकते. कुटुंबात काही वाद निर्माण होऊ शकतात. तुम्ही अधिक जबाबदारीने वागणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमचे काही पैसे खर्च होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल.
मीन : व्यवसायात तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. तुमच्या व्यवसायासाठी दिवस सर्वोत्तम असेल. मित्रांसोबत फिरायला जाल. दुपारनंतर काहींचा उत्साह वाढेल. प्रवास होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुमची मुले स्पर्धेत सहभागी होतील. तुम्हाला थकवा जाणवेल. दुपारनंतर तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.