मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीवर आज सर्वौच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर पहिली सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आरक्षणाबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. खंडपीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. त्यामुळे ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आरक्षणावर सुनावणी होणार असल्यानं मराठा नेत्यांचा भुवया उंचावलेल्या आहेत. तसेच पुर्ण ताकदीने सरकार या खंडपीठासमोर बाजू मांडले असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर आता राजकीय चर्चेला रंग चढला आहे.