जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून आज १२३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अवघे ६३ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २७, जळगाव ग्रामीण- ०३, भुसावळ-११, अमळनेर-०१, चोपडा-०१, पाचोरा-०१, भडगाव-०४, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-०३, रावेर-०१, पारोळा-००, चाळीसगाव-०७, मुक्ताईनगर-००, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार ०९६ पर्यंत पोहचली असून ५० हजार ८५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ९७८ रुग्ण सध्या उपचार घेताय.