मेष : आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. कौटुंबिक प्रगतीचा विचार कराल. हातातील कामात यश येईल. एखादी नवीन संधी चालून येईल. नवीन मित्र जोडाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका.
वृषभ : आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. दिवस चैनीत घालवाल. निसर्ग सान्निध्यात रमून जाल. घरात कर्तेपणाचा मान मिळेल. तिजोरीत भर पडेल.
मिथुन : आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. घरातील लोकांच्यात वेळ घालवाल. आवडी-निवडीबद्दल दक्ष राहाल. घरातील कामात हातभार लावाल. पत्नीची प्रेमळ साथ मिळेल.
कर्क : आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. आपल्याच मर्जीने वागणे ठेवाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. तुमच्यातील अरसिकता वाढेल. वादाचा मुद्दा उकरून काढू नका. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी.
सिंह : आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई – वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. वैचारिक स्थैर्य जपावे. अडचणीवर मात करता येईल. मानसिक उभारी ठेवावी लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. फार विचार करत बसू नका.
कन्या : आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचे वर्चस्व राहील. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. सामाजिक कामात हातभार लावाल. तुमची सामुदायिक प्रतिष्ठा वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
तूळ : आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. घरगुती कलह वाढू देऊ नका. सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. अती अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
वृश्चिक : आज आपण तन – मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. भावंडांना मदत करावी लागेल. मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल. नातेवाईक नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.
धनू : आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. एखादी दुर्घटना संभवते. हातातील कामे खोळंबू शकतात. कौटुंबिक अडचण सोडवता येईल. जुगारातून लाभ संभवतो. फसवणुकीपासून सावध राहा. आर्थिक उलाढाली सजगतेने कराव्यात.
मकर : आजचा दिवस नोकरी – व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. कामाचा उत्साह कायम ठेवावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पीत्त विकार बळावू शकतात. कामातील प्रतिकूलता प्रयत्नाने दूर करावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.
कुंभ : आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी – व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. अघळ-पघळ गप्पा माराल. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. कामाचा फार ताण घेऊ नये. जबाबदारी उत्तम रित्या पेलाल. घराची स्वच्छता काढाल.
मीन : आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. इतरांशी वाद वाढू शकतो. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठांना नाराज करू नका. मनाजोगी खरेदी करता येईल. घराबाहेर वावरतांना सावध राहावे लागेल. (Today Rashi Bhavishya, 15 March 2023)
















