मेष : जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष देऊ शकणार नाही आणि ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नसते साहस करायला जाऊ नका. दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.
वृषभ : आज तुम्ही काही नवीन लोकांशी संबंध जोडू शकता. आज अचानक तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाची जबाबदारी पार पाडू शकाल. आज अधिकारी नोकरदार लोकांना असे फायदे आणि सौदे सांगू शकतात, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.
मिथुन : आज तुम्हाला तुमच्या समजुतीने घेतलेल्या निर्णयात नक्कीच यश मिळेल. अनपेक्षित लाभ होईल. मिथुन राशीचे लोक प्रवास करू शकतात, व्यवसाय किंवा वैयक्तिक कामामुळे सुखद प्रवास होऊ शकतो. वाचनाची आवड वाढेल. संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.
कर्क : आज काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. इतरांवर अवलंबून राहिल्याने नुकसान होईल. पत्नीकडून आश्वासन मिळेल. स्वतःचे निर्णय फायदेशीर ठरतील. मानसिक समाधान व आनंद मिळेल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल. कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.
सिंह : वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज जोडीदारावरील विश्वास अधिक दृढ होईल, परंतु आज तुमच्या वडिलांची तब्येत खराब होऊ शकते ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. घराबाहेर सुख-समृद्धी राहील. वैवाहिक प्रस्ताव मिळू शकतो. मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.
कन्या : आज प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांच्या सहकार्याची गरज भासेल. पार्टी आणि फिरायला जाण्याचा आनंद लुटता येईल. बौद्धिक कार्य यशस्वी होईल. आनंद होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.
तूळ : आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप सहकार्य आणि साथ मिळत आहे. व्यवसायात नवीन करार करण्यासाठी आज तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घेऊ शकता. वरिष्ठांची मदत मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. काळजीपूर्वक वागा. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.
वृश्चिक : प्रेम जीवनात काही अडथळे असतील तर तेही आज संपुष्टात येतील. आज तुम्हाला मुलाकडून काही आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जुने मित्र आणि नातेवाईक भेटतील. चांगली बातमी मिळेल. आनंद होईल. जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
धनू : आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आदर वाढू शकतो. सामाजिक दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. घराबाहेर चौकशी होईल. उत्पन्न वाढेल. मित्रपक्ष मदत करणार नाहीत. इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.
मकर : आज कुटुंबात तुमचा आदर वाढेल. या दिवशी कोणाकडे उधार मागितल्यास ते सहज उपलब्ध होईल, परंतु या दिवशी उधळपट्टी टाळावी लागेल. गुंतवणूक शुभ राहील. बाहेरच्या मदतीने कामे होतील. देवाबद्दलची आवड वाढेल. नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
कुंभ : आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमातही सहभागी व्हाल आणि त्याचा नक्कीच फायदा घ्याल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मोठे प्रॉपर्टी डील मोठा नफा देऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.
मीन : संध्याकाळी एखाद्या मित्राशी किंवा शेजाऱ्यासोबत काही तणाव असू शकतो, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील, परंतु आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या मदतीने तुमच्या समस्या सोडवू शकाल. आज तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल जिथून फायदा होईल. जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. (Today Rashi Bhavishya, 26 May 2023)