मेष : व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस थोडा साधारण असेल. अर्ध्या दिवसात तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल. निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला तुमच्या मनात निराशावादी विचार येण्यापासून थांबवावे लागेल.
वृषभ : आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता, तुम्ही त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. आज तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर खूप जपून जावे लागेल कारण अपघाताची भीती आहे.
मिथुन : बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे तुमचे एखाद्याशी मतभेद होऊ शकतात. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काळ निर्णयावर येऊ नका. आज तुम्हाला भागीदारीत व्यवसाय केल्याने फायदा होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कर्क : तुम्ही समाजकार्य केलं किंवा समाजासाठी काही चांगलं काम केलं तर समाजात तुमची प्रतिष्ठा खूप वाढू शकते. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. अधिकार्यांवर छाप पाडता येईल. जोडीदाराच्या सल्ल्याने केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदा होईल.
सिंह : आज अनावश्यक खर्च करू नका. अनावश्यक खर्च थांबवा, अन्यथा आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आज तुमच्या व्यवसायाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कोणत्याही सहकाऱ्याच्या प्रभावाखाली येऊ नका.
कन्या : जर तुम्ही व्यवसायात पैशाचे व्यवहार सावधगिरीने केले नाही, तर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. आज तुम्ही कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा सौदा करणार असाल, तर त्याची जंगम बाजू नीट तपासा. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल.
तूळ : जे लोक बेरोजगार आहेत, त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. आज तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचे असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला.
वृश्चिक : व्यवसायात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता.
धनू : आज तुमचे विरोधकही तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रलंबित येणी मिळतील. सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो.
मकर : जर तुमची मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर आज तुम्हाला त्यात विजय मिळू शकेल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. आज तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल कमी चिंतित असाल कारण कमी नफा मिळूनही तुम्ही तुमचे घरगुती खर्च भागवू शकाल.
कुंभ : आज तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावध राहा, ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. नवीन गुंतवणूक करता येईल. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. आज घरातून निघताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. आज तुमची सर्व कामे यशस्वी होतील.
मीन : आज तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल. बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या काही शत्रूंपासून सावध राहावे लागेल .