मेष : आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आर्थिक कामे मार्गी लागत असल्याने आपले मनोबल उंचावणार आहे. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी सावध रहा. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्हाला अनपेक्षित लाभ होतील. व्यवसाय तुमचा चांगला चालेल.
वृषभ : आज तुम्ही जे काही काम कराल ते तुम्हाला पूर्ण समर्पण आणि मेहनतीने करावे लागेल. उत्साही राहाल. नवीन उमेदीने नवीन गोष्टीची सुरुवात करण्यास काहीच हरकत नाही. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठी खूप चांगला असू शकतो. आपले मनोबल वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचा मान-सन्मान वाढेल. संपत्तीत वाढ होईल. घर आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे.
मिथुन : तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनोबल व आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. मानसिक अस्वस्थता राहील. आज आपण कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये. तुम्हाला तुमची नाती मजबूत करण्याची संधी मिळेल. प्रतिकुलता जाणवणार आहे. अनावश्यक मनस्ताप संभवतो. मालमत्ता खरेदी करता येईल. मालमत्तेतील गुंतवणूक नफा देईल.
कर्क : आज तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांकडून खूप प्रेम मिळेल. मुला-मुलींसाठी वेळ देऊ शकणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. रकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांनाही आज चांगली बातमी मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात प्रवास सुखकर होतील. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. व्यापारी वर्गाला त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून व्यवसायात लाभ होऊ शकतो.
सिंह : तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, नाहीतर तुम्हाला नंतर आर्थिक चणचण भासू शकते. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मनोबल वाढणार आहे. आज तुमचे उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. आज जवळच्या नातेवाईकांचं घरी आगमन होऊ शकतं. आज अववजड सामान उचलणं टाळा.
कन्या : तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. काहींना गुरुकृपा लाभेल. तीर्थक्षेत्री भेट द्याल. प्रवासाचे योग संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. म्हाला नवीन जीवनसाथी मिळू शकतो. तुमच्या आशा-आकांक्षा सफल होतील. आज आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल. व्यापाराशी संबंधित तुमचा आज अनेक लोकांशी संपर्क होऊ शकतो.
तुळ : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमाने भरलेला असेल. कामाचा ताण जाणवेल. स्वास्थ्य कमी राहील. एखाद्या मनस्तापदायक घटनेला आपल्याला सामोरे जावे लागेल. आज तुम्हाला व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. खर्च वाढणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाऊ शकता. प्रतिकुलता जाणवेल. व्यवहार करताना सावधानता बाळगा. वाणीवर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : आज तुम्हाला तुमच्या कामात खूप यश मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. आज तुमचा मूड चांगला असणार आहे. अनेक कामात सुयश मिळवाल. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. व्यावसायिकांचे आज अनेक नवीन प्रोजेक्ट्स फायनल होतील.
धनु : आज तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. प्रवासात विशेष काळजी घ्यावी- एखादी अप्रिय घटना संभवते. आज तुम्हाला मोठे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. आपले मन शांत व संयमी ठेवण्याचा प्रयत्न करावा मानसिक अस्वस्थतेमुळे कामामध्ये लक्ष लागणार नाही. व्यवसायात आज मोठा नफा मिळू शकतो आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढू शकतो. प्रवास टाळावेत.आज मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना आज शुभवार्ता मिळू शकते. पण, कामात खबरदारी घ्या.
मकर : आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल कारण जास्त खर्च केल्याने तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे यशस्वी करणार आहात. प्रवासात आनंददायी घटना घडेल. तुमच्या क्लाएंटबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगा.
कुंभ : आज तुम्ही तुमच्या नात्यात खूप सुधारणा पहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे.आज तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला जे काम करायचे आहे ते सहज पूर्ण होईल. काहींना अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे- खर्च वाढणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मान लाभेल. मित्रांबरोबर फिरण्याचा प्लॅन करू शकतात. आजच्या दिवशी कामाची दगदग असेल पण तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे.
मीन : नोकरदार लोक त्यांच्या कामात खूप व्यग्र राहतील. प्रवासाचे योग येणार आहेत- मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखा. काहींना अचानक धनलाभ संभवतो तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. अनपेक्षित भाग्यकारक घटना घडेल. आज जवळच्या नातेवाईकांचं घरी आगमन होऊ शकतं.लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही आज चांगले परिणाम मिळणार आहे.