मेष –
समाजकार्य व मित्रांसोबत दिवस धावपळीचा जाईल. सरकारी कामात यश मिळेल. अतिथी आगमन होईल. पर्यटनास जाण्याची शक्यता. विवाहितांसाठी विवाहसंधी संभवतात.
वृषभ –
नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नती व वेतनवाढ मिळू शकते. सामाजिक जीवनात सुख-शांती लाभेल.
मिथुन –
नवीन कामासाठी दिवस प्रतिकूल. थकवा आणि उत्साह कमी होईल. वरिष्ठांची नाराजी संभवते.
कर्क –
संताप आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा. संयम राखा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह –
मध्यम फलदायी दिवस. नोकर-व्यवसायात मतभेद संभवतात. सामाजिक जीवनात यश मिळेल. सावधगिरी बाळगा.
कन्या –
उत्साह व स्वास्थ्य चांगले राहील. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. खर्च वाढेल.
तूळ –
मध्यम फलदायी दिवस. संततीची काळजी घ्यावी लागेल. कार्य अपूर्ण राहण्याची शक्यता. प्रिय व्यक्तीचा सहवास मिळेल. मानहानी संभवते. प्रवास टाळावा.
वृश्चिक –
शांतचित्ताने दिवस घालवा. मतभेद आणि आर्थिक हानीची शक्यता. दस्तऐवज काळजीपूर्वक हाताळा.
धनु –
नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस. भावंडांसोबत सौहार्द राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. कार्यसिद्धीचा योग आहे.
मकर –
कुटुंबात वाद संभवतात. गुंतवणुकीसाठी नियोजन करा. प्रकृती साधारण राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.
कुंभ –
शरीर व मन उत्साही राहील. लाभदायी दिवस. मित्र-परिवारासोबत सहलीचा योग. वैवाहिक जीवन सुखी राहील. नकारात्मक विचार टाळा.
मीन –
अतिलोभ टाळा. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा. गुंतवणुकीपूर्वी विचार करा. मन एकाग्र राहणार नाही. मांगलिक कार्यावर खर्च. कुटुंबात मतभेद संभवतात.