मेष : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत, मात्र प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. आज काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ : आजचा दिवस चांगला जाणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. प्रवासात सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल. आपल्याला विविध लाभ होणार आहेत. काहींना प्रियजन भेटल्याने आनंद होणार आहे. सौख्य लाभेल. विरोधकांपासून सावध राहावे, ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे तुमच्यावर खूप ताण येऊ शकतो.
मिथुन : आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. मनोबल उत्तम राहील. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवासात आनंददायी घटना घडेल. तुम्हाला काही फसव्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवू नका अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कर्क : व्यवसायात काही अडचणी येत असतील तर त्यात आज सुधारणा होईल. मानसिकता सकारात्मक असल्याने आज आपण अनेक कामे यशस्वी करणार आहात. तुमच्या काही चुकांमधून तुम्हाला शिकावे लागेल. मनोबल उत्तम राहील तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला नफा मिळू शकतो.
सिंह : तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. पूर्वी एखादी चूक केली असेल तर आज त्याबद्दल माफी मागावी लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत. कुटुंबातील सदस्याबरोबर आनंदात वेळ घालवणार आहात. व्यावसायिकांना व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. जर तुम्हाला शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला फायदा होईल.
कन्या : आज तुमच्यात खूप उत्साह असेल ज्यामुळे तुम्ही मोठ्या गुंतवणुकीची योजना करू शकता. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आज तुमचे मन विशेष आंनदी असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जवळच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही इतरांना सहकार्य करण्यासाठी तत्पर राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. गुंतवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या भागीदाराशी बोलणे आवश्यक आहे.
तूळ : जर तुम्हाला आर्थिक बाबतीत काही अडचणी येत असतील तर त्यापासूनही तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. आपल्यावर असणारा ताण आज स्वास्थ्य लाभू देणार नाही. अनावश्यक मनःस्ताप संभवतो. आज तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना मदत कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. कामाकडे दुर्लक्ष केले नाही तर तुम्हाला नोकरीमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
वृश्चिक : कुटुंबातील एखाद्या सदस्याला चांगली बातमी कळू शकते. आपले स्वास्थ्य आपल्या हातात आहे, याची आपल्याला पूर्ण जाणीव होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज आळस सोडावा लागेल. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आज तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. मचा व्यवसाय चांगला चालेल.नवीन व्यवसाय उघडण्याचा प्रयत्न केलात तर ते कामही चांगले होईल.
धनु : व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. प्रवासात स्वास्थ्य लाभेल. आज आपण अनेकांना मदत करू शकणार आहात. तुम्ही दानधर्माच्या कार्यातही सहभागी व्हाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. व्यवसाय खूप प्रगती करेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला पैसे मिळू शकतात. कार्यक्षेत्रात तुमचे आवडते काम करण्याची संधी मिळेल.
मकर : आज आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका. मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. कामाचा ताण कमी होईल. आज कोणालाही कसलेली वचन देऊ नका, नाहीतर ते पूर्ण करणे जड जाऊ शकते. तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी आपल्याला नक्की लाभेल. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
कुंभ : आजचा दिवस खर्चिक असणार आहे. तुमचे काही वाढलेले खर्च तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील. तुमच्यावर आज अनावश्यक मानसिक ताण असणार आहे. कामाचा व्याप मागे असेल, मात्र कामामध्ये लक्ष लागणार नाही. परदेशातून आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. आज आपण शक्यतो महत्त्वाची कामे करू नयेत. खर्च वाढणार आहेत. तुम्हाला व्यवसायाच्या परिस्थितीत काही चढ-उतारांना सामोरे जावे लागेल.
मीन : भरघोस नफा मिळविण्यासाठी अयोग्य योजनांमध्ये पैसे गुंतवू नका. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकेल. आपल्यावर असणारी जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडू शकणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. भागीदारीत व्यवसाय चालवत असाल तर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याची घाई करू नका.