मेष : आज तुमचे कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर तुम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद घालू नका. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.
वृषभ : आज तुम्हाला काही अचानक लाभ मिळू शकतात, ज्यामुळे तुम्ही संशयात पडाल, ज्याची तुम्ही अपेक्षाही करत आहात. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य जपावे.
मिथुन : व्यवसायात आज तुम्हाला दिवसभर छोट्या नफ्याच्या संधी मिळत राहतील. संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात घालवाल.कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा टाळावी. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे.
कर्क : जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय चालवला असेल तर आज तुमच्यामध्ये काही वाद होऊ शकतात. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.
सिंह : आज तुम्हाला इतरांचे म्हणणे मानून गुंतवणूक करणे टाळावे लागेल, अन्यथा भविष्यात तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मनाला न पटणार्या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल.
कन्या : आज संध्याकाळी तुम्हाला अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु प्रयत्नांनंतरच तुम्हाला लाभ मिळू शकेल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील.
तूळ : तुम्ही मित्रांसोबत कमी अंतरावर फिरायला जाण्याचा विचार करू शकता. आज तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वाद टाळावेत. कोर्ट – कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.
वृश्चिक : आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.
धनू : संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, ज्यामध्ये लहान मुले मजा करताना दिसतील. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.
मकर : वैवाहिक जीवनात गोडवा राहील. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
कुंभ : तुम्हाला जमीन, वाहन किंवा इमारत खरेदी करायची असेल तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल.
मीन : आज तुम्हाला तुमच्या घर किंवा व्यवसायात घाईगडबडीने निर्णय घेणे टाळावे लागेल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल. वस्त्रे अलंकार, वाहन खरेदी होईल. बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल.