मेष : प्रवासाचे योग येतील.पण चानक प्रवासाल निघालात तर एखादा अपघात होण्याची भीती आहे. जिद्दीने कार्यरत राहून मनोबल वाढेल. आत्मविश्- वासपूर्वक निर्णय घ्याल. एखद्या जुन्या चुकीचा पश्चात्ताप तुम्हाला होईल. अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. नातेवाईकांच्या अपेक्षित गाठीभेटी पडतील. काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो.
वृषभ : आज कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील. स्वास्थ्य लाभणार आहे. वडिलांच्या सल्ल्यावर अंमलबजावणी करा. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. उत्पन्नाच्या अनेक स्त्रोतांमधून आर्थिक लाभ होईल.
मिथुन : भागीदारीत काही करण्याने तुम्हाला चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. संमिश्र फळ देणारा दिवस असेल. तुमचे मन आशावादी राहील. सकारात्मकपणे विचार कराल. गुंतवणूक करण्याचा निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवा.
कर्क : मुलांच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. काहींना नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे. कामे नकोशी होतील. आजचा दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. आज तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. मनोबल कमी असणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. भागीदारी व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे.
सिंह : तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. मनोबल वाढेल. विविध लाभ होतील. वरिष्ठांचे तसेच नोकरीतील सहर्कायांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आज तुमच्या घरातीलच एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायिकांचा चांगला फायदा होईल, तुमचे ग्राहक वाढतील.
कन्या : आज लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. सर्वत्र तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून दैनंदिन कामे यशस्वी कराल.तुमची एखादी जुनी चूक कुटुंबियांसमोर उघड होऊ शकते. प्रवास होणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहून सुयश मिळवाल. व्यवसाय वाढवण्याच्या नादात अनावश्यक ताण घेऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं.
तूळ : काही कामे पुर्ण न झाल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक चिंता कमी होतील. आज आर्थिक लाभाचा दिवस. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवा. घरगुती समस्यांमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता.
वृश्चिक : राजकारणी लोकांनी आज सावधान राहण्याची आवश्यकता आहे. जिद्दीने कार्यरत रहावे लागणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. नव्या योजनांवर विचारपूर्वक पैसे गुंतवा. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल, तुम्हाला व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु : कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या कटात अडकणार नाहीत, याची काळजी घ्या. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे यशस्वी कराल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. दीर्घकाळ रखडलेले कोणतेही काम पूर्ण करण्यात अडचणी येतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. उत्साही राहणार आहात. व्यवहार करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो.
मकर : वादविवादापासून दूर रहावे. प्रवासात काळजी हवी. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. खर्च वाढणार आहेत. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. व्यवसायात पैसे गुंतवणं टाळा, आजचा दिवस चांगला नाही.
कुंभ : जमीन आणि वाहन खरेदीचा निर्णय आज तुम्ही घेऊ शकता. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून पैसे मिळू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढेल. विविध लाभ होतील. आज वाहन नीट चालवा, वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे.
मीन : पैशांसंबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आजचा दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटी वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.