मेष : घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
वृषभ : घाईगडबडीने कोणतेही काम करू नका, अन्यथा काम बिघडू शकते. अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कामे गतीने पूर्णत्वास जातील. आर्थिक चिंता निर्माण होईल.
मिथुन : व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.
कर्क : आज तुम्हाला कौटुंबिक सदस्याकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या. नोकरी – व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे.
सिंह : कोणतेही नवीन काम किंवा करार करायचा असेल तर घाई करू नका, अन्यथा चूक होऊ शकते. व्यायामाचा कंटाळा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो.
कन्या : आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत संध्याकाळपासून रात्रीपर्यंत मजेत वेळ घालवाल. आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.
तूळ : आज समस्यांना संयमाने तोंड द्या. कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. झोपेची तक्रार जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल. तुमचे एखादे काम काही काळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक : आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वेळ न दिल्याने तुमची मुले तुमच्यावर नाराज होऊ शकतात. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करा. आर्थिक चिंता मिटेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल.
धनू : कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. जर कुटुंबात काही समस्या चालू होत्या, तर त्या देखील आज संपुष्टात येईल
मकर : शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. भावंडांशी मतभेद टाळा. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही.
कुंभ : व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो देखील आज तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल.
मीन : अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.आर्थिक देवाण – घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. व्यापार क्षेत्रात आज तुम्हाला अनुकूल लाभ मिळणार असल्याने तुमचे मन प्रसन्न राहील.