मेष : अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सामाजिक जाणीव कायम ठेवाल. विद्यार्थ्यांना आज परीक्षेत उत्कृष्ट यश मिळेल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल.
वृषभ : बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. मित्रांशी वाद घालू नका. कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. दिवस खुशीत घालवाल. आज तुम्ही अशा गोष्टींवर पैसे खर्च कराल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची सुखसोयी वाढेल.
मिथुन : व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना आज पगारात वाढ होऊ शकते.
कर्क : कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांच्या बदलीची चर्चा होऊ शकते.
सिंह : कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही. तुमच्या जोडीदाराला काही शारीरिक समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. आज जर तुमचा आईशी वाद झाला असेल तर तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल.
तूळ : आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून खूप आदर मिळेल असे दिसते. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. चांगल्या कामासाठी प्रवास होतील.
वृश्चिक : आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत. संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांनी आज एखादा प्रकल्प सुरू केला तर त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळू शकतो.
धनू : जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू केला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर देखील असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल.
मकर : बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आज सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो.
कुंभ : आज तुम्ही तुमचे कोणतेही सरकारी काम पुढे ढकलू नका. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल.
मीन : आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. वाहन चालवताना सावधानता बाळगा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असाल.