मेष : आज व्यवसाय करणारे लोक त्यांच्या योजनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही उत्तम रीतीने पार पाडणार आहात. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. मची एखादी जुनी योजना पुन्हा सुरू होऊ शकते. कामाचा व्याप असलातरी तुमचा उत्साह टिकून असणार आहे. तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहाल. आज स्वतंत्रपणे कार्य करण्यात आनंद वाटेल.
वृषभ : आज कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मनोबल व उत्साह वाढेल. नकारात्मकता कमी होईल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. तुमच्या एखाद्या कामामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. गेले दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनावश्यक गोष्टीत पैसा खर्च होईल. नोकरी धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
मिथुन : आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. मानसिक ताण-तणाव राहतील. प्रवास शक्यतो टाळावेत. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. आज एखाद्या गोष्टीवर राग आला असला तरी रागावर नियंत्रण ठेवा, दैनंदिन कामात आपल्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय पटकन न घेतल्यामुळे आलेली संधी निघून जाण्याची शक्यता आहे. आज घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयापासून लाभ होईल.
कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. काही घरगुती कामांची संपूर्ण जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडाल.तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या काम करण्याच्या कुशलतेमुळे बऱ्याच जणांचा फायदा होईल.
सिंह : नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या तुमच्या इच्छेला सध्या लगाम लागू शकतो. आज आपणाला एखादा मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. कामे रखडतील. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. आज व्यवसायात कोणालाही भागीदार बनवू नका, अन्यथा तो तुमचा विश्वासघात करू शकतो. बोलण्याने लोकांना आपले कराल. महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे. आज आपल्याला अनावश्यक एखादा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
कन्या : तुमच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो आज दूर होईल. संततीसौख्य लाभेल. तुम्ही आपल्या प्रियजनांकरिता वेळ द्याल. प्रेमीजनांना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळाल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे व मित्र-मैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल. तणावाच्या वातावरणात शांत बसणे योग्य ठरेल. व्यवसाय कसा वाढेल याचा विचार जास्त कराल.
तुळ : कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे आज तुम्ही अधिक व्यग्र असाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामात शांतता राखावी लागेल. तुमचे मन आज अत्यंत आनंदी व आशावादी असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे यशस्वी होतील. दुसऱ्याला योग्य सल्ला द्याल. पण कोणाचेही वर्चस्व सहन करणार नाही.
वृश्चिक : आज अविवाहित लोकांसाठी लग्नाचे उत्तम प्रस्ताव येऊ शकतात. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूलता लाभेल. नवीन सुसंधी निर्माण होईल. अनुकूल दिशा सापडेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करणार असाल तर तुमची ही इच्छाही पूर्ण होऊ शकते. आनंदी राहाल. काहींना अचानक प्रवासाचे योग संभवतात. मिळालेल्या पैशाला अनेक वाटा फुटतील मानासीक शांती जपा नाहीतर त्याचा प्रकृतीवर परिणाम होईल.
धनु : तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहेत. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही चांगले नाव कमावण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवाल. तुमच्या गोड बोलण्याचा परिणाम इतरांवर होऊ शकतो.
मकर : घरात आणि बाहेर समन्वय राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक ताण कमी होईल. आज तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. रखडलेल्या कामात सुयश लाभेल. आजचा दिवस अनुकूल असणार आहे. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. भावंडांशी मतभेद संभवतात. दिलेला शब्द पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
कुंभ : पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला ठरणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नको. आनंदी व आशावादी राहण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. दैनंदिन कामात प्रतिकूलता जाणवण्याची शक्यता आहे. तणाव कमी होईल. कोणाला कडक बोलू नका.
मीन : तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात गुंतून राहाल. आर्थिक लाभ होणार आहेत. प्रिय व्यक्तींच्या सहवासात आजचा दिवस आपण आनंदाने व्यतीत करणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळाल्याने आनंद होईल. तुमच्या कामाचा आज तुम्हाला मोबदला मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज डोकेदुखीचा त्रस संभावतो. तरी देखील आज एक वेगळाच उत्साह जाणवणार आहे.