मेष : व्यवसायाच्या दृष्टीनेही आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने आज आपली अनेक कामे आपण मार्गी लावू शकणार आहात. तुम्हाला पैसे मिळवण्याची आणि तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याची चांगली संधी मिळू शकते.मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृषभ : आजचा दिवस खूप चांगला परिणाम देणारा आहे. आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुम्ही पदोन्नतीची अपेक्षा देखील करू शकता. तुम्ही आज खुश असणार आहात. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. तुम्हाला व्यवसायातही चांगले परिणाम मिळतील. तुमचे काम पुढे नेण्यासाठी तुम्ही नवीन योजना राबवाल. व्यवसायात उत्तम लाभ होणार आहेत.
मिथुन : आज तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्हाला पैशाच्या बाबतीतही सावध राहावे लागेल. आपली दैनंदिन कामे आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आनंदी राहाल.
कर्क : तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा आणि तुमच्या पैशांचं काळजीपूर्वक व्यवस्थापन करा. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. काहींना एखादी मनःस्तापदायक घटना संभवते. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस थोडा कठीण जाईल. आज आपण कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींपासून जपावे. आज तूम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधीही मिळू शकतेविनाकारण त्रास संभवतो.
सिंह : आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आपले मन आज जुन्या आठवणींमध्ये रमणार आहे. तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा प्रभाव राहील. आर्थिक बाबींमध्ये नफा झाल्याने आज तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. तुम्हाला पैशाच्या कमतरतेपासून दिलासा मिळेल. आज तुम्ही नवीन मित्र-मैत्रिणी बनवणार आहात. आपणाला अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : आज तुम्हाला कामात मोठे यश मिळेल. तुमच्याकडे पैशाचा ओघ असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. मनोबल उत्तम राहील. आजची आपली सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता. प्रवासातून काहींना विशेष फायदा होईल. विवाहेच्छुक लोकांना आज चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे.
तुळ : आज तुम्ही कोणतीही नवीन सुरुवात करणे टाळावे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. तुम्ही आज विशेष आंनदी व आशावादी असणार आहात. आज तुम्ही तुमचे मन ताजेतवाने करण्यासाठी स्वतःला तयार करा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृश्चिक : आज तुम्हाला कामात यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कराल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. कोणावरही खूप विश्वास ठेवू नये आणि विचारपूर्वक वागावे. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक होणारे मतभेद टाळावेत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
धनु : आज तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमचे विचार व तुमची मते तुम्ही इतरांना पटवून देऊ शकणार आहात. तुम्हाला वेळोवेळी तुमच्यातील ऊर्जा खर्च करावी लागू शकते. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्याला मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : शेअर बाजारात काम करणाऱ्यांना आज गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुमच्या व्यवसायातही पैसे कमावण्याचे अनेक मार्ग खुले होतील. आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. स्वास्थ्य कमी राहील. पल्या आहाराकडे लक्ष द्या आणि पौष्टिक अन्न खा. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने आज आपली दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास नकोत.
कुंभ : आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत सावध राहावे लागेल. आज आपल्या मुला-मुलींकरिता आपला वेळ देणार आहात. प्रियजनांशी सुसंवाद साधणार आहात. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे.
मीन : आपण सावधगिरी बाळगणे आणि आपल्या निर्णयांचा नीट विचार करणे आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या गुंतवणुकीत वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. मनोबलाच्या जोरावर आज आपण विशेष कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत.