मेष : आज वाद विवाद होत असतील तर त्यात जास्त भावूक होणे टाळावे लागेल, अन्यथा तुमच्या भावनिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणी तरी करू शकतो. व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आर्थिक घडी सुधारेल. आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
वृषभ : आज कुटुंबात काही पूजा वगैरेही आयोजित करता येतील. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. काही वाद देखील संभवतात.
मिथुन : आज तुम्हाला काही शारीरिक त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील.
कर्क : विद्यार्थ्यांना आज पैशांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागू शकते. आज करिअर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल. अचानक खर्च वाढतील. पोटदुखीचा विकार बळावेल. वाद संभवतात. मानसिक चिंता व उद्वेग राहील.
सिंह : आज तुमच्या व्यवसायात इच्छित लाभ मिळाल्याने आनंदी असाल.व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. सुसंवाद साधाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज काही संधी मिळतील.
कन्या : तुमची आवडीची कामे आज तुम्हाला करायला मिळतील. दीर्घकाळ रखडलेले तुमचे काम आज पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. शासकीय कामे मार्गी लागतील. शत्रुपिडा नाही. आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे.
तुळ : आज कुठूनतरी रखडलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. दुसऱ्याच्या कामात तेवढाच हस्तक्षेप करा जेवढी गरज आहे. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सतावेल. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यास परिणाम सकारात्मक मिळतील.आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे.
वृश्चिक : आज वरिष्ठांच्या आणि पालकांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी गोष्ट मिळू शकते, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात. गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. घरात सुखा – समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सगे – सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल.
धनु : कुटुंबातील काही खर्च अचानक वाढू शकतात, जे तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील. धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल.
मकर : मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचा विचार करत असाल तर चांगली बातमी कानावर येईल. आज पैसे गुंतवण्याआधी विचार करा किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आजचा दिवस लाभदायी आहे.
कुंभ : आज कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. समोरील व्यक्तीवर पटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शत्रुपिडा नाही. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल.
मीन : अनावश्यक खरेदी केली जाईल. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज संध्याकाळी एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा बेत आखू शकता. आज तुमची प्रगती पाहून तुमच्या काही शत्रूंना तुमचा हेवा वाटेल, ते तुमचं कौतुक करतील पण तुम्ही सावध राहा.
















