TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यावरील गोळीबार प्रकरण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल, दोघं ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार झाला होता. या प्रकरणी रामानंद पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना आज जामनेर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक असे की, पिंप्राळा परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादात मध्यस्थी करुन तो वाद सोडविल्याच्या रागातून एका गटाच्या चार जणांनी रविवार २५ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभुषण पाटील (रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा) यांच्यावर तसेच त्यांच्या घरावर गोळीबार केला. तसेच फोनवरुन दुपारी दोन वेळा जीवे मारण्याच्या धमकी दिली होती. या प्रकरणी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या फिर्यादीवरुन मध्यरात्रीनंतर महेंद्र राजपूत, उमेश राजपूत, मंगल राजपूत व बिर्‍हाडे (पूर्ण नाव माहित नाही, चौघे रा. पिंप्राळा) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात प्राणघातक गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

गोळीबार मागील कारण
रविवार, २५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता नितीन भिमसिंग पाटील, निलेश ठाकूर व उमेश ठाकूर यांच्या पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता. याबाबत तिघेही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. याबाबत उपमहापौर कुलभुषण पाटील यांना वादाबाबत माहिती मिळाल्याने दुपारी पाटील हे पोलीस ठाण्यात गेले. तसेच त्यांनी दोघांना गटामध्ये समझोता घडवून आणला होता. त्यानंतर सर्व जण घरी निघून गेले.

आधी फोनवरून शिवीगाळ आणि धमकी
रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी बिर्‍हाडे नावाच्या व्यक्तीने कुलभुषण पाटील यांना फोन केला. फोनवरुन बिर्‍हाडे याने पाटील यांना दुपारी पोलीस ठाण्यात समझोता घडवून आणला, नितीन राजपूत याला माझ्याकडे आणणार होता, आम्ही त्याला सोडणार नाही, त्याला जीवे ठार मारु व तू मध्ये पडला तर तुझाही गेम करु, अशी धमकी दिली होती. यावेळी उपमहापौर पाटील यांनी भानगडी करुन नका, आपण उद्या भेटू असे सांगितले. यावेळी बिर्‍हाडेने शिवीगाळ केल्याने पाटील यांनी फोन कट केला. त्यानंतर रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी पुन्हा उपमहापौर पाटील यांना फोन केला. तु कुठे आहे ते आम्हाला माहिती आहे. तु फार मोठा नेता झाला आहे, तुला फार समाज कार्याची पडली आहे, तुला अशा भांडणी मिटविण्यामध्ये मोठे वाटते, आज आम्ही तुझा गेम करु, उद्याचे पेपर मोठे मोठ बातम्यांनी भरलेले असतील परंतू ते वाचालया तु जीवंत राहणार नाही, अशी धमकी फोनवरुन बोलणार्‍या व्यक्तीने दिली.

असा केला गोळीबार
रात्री ९ वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभुषण पाटील त्यांचा मित्र अनिल जनाप्रसाद यादव यांच्यासोबत घराकडे येत होते. पिंप्राळा हुडकोरोडवरील जुन्या लाकडाची वखारजवळ एका चारचाकीने दुचाकी अडविली. दुचाकीचा काचा खाली करुन गाडीतील महेंद्र राजपूत, उमेश राजपूत, मंगल राजपूत या तिघांनी कुलभुषण पाटील यांच्या दिशेने पिस्तोल रोखून शिवीगाळ करत दमदाटी केली. व आज तुझा गेम करणार तुला जीवंत सोडणार नाही धमकी दिली. या प्रकाराने भयभीत झालेले कुलभुषण पाटील दुचाकीने घराकडे येण्यात निघाले. संबंधित चारचाकीने त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. उपमहापौर पाटील यांनी त्यांच कुटुंबियांना घरात जायचे सांगून, स्वतः पाटील हे घराच्या बाजूने पळाले. त्यानंतर पाठलाग करणारी चारचाकी मयुर कॉलनी येथील उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या घराजवळ आली. याठिकाणी कुलभुषण पाटील यांच्या घरावर तसेच पाटील यांच्यावर असे एकूण तीन वेळा चारचाकीतून उतरलेल्या चौघा संशयितांनी गोळीबार केला. आणि कोणी मध्ये आल्यास त्यांनाही मारु अशी धमकी तसेच शिवीगाळ केली. गल्लीतील इतर नागरिकांनी गर्दी केल्याने संशयित चारचाकी घेवून निघून गेले. अशी फिर्याद उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी दिली असून त्यावरुन रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिसात महेंंंद्र राजपूत, उमेश राजपूत, मंगल राजपूत व बिर्‍हाडे पूर्ण नाव माहित नाही, चौघ रा. पिंप्राळा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.

जामनेर तालुक्यातून दोघं ताब्यात
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रविवारी रात्री गोळीबार करणार्‍या चारजणांपैकी दोन संशयितांना आज दुपारी रामानंदनगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत (रा. पिंप्राळा जळगाव), असे ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावं असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

धक्कादायक : चोरट्याने लांबविला चक्क महिला पोलीस उपनिरीक्षकाचाच मोबाईल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपचं हिंदुत्व म्हणजे ‘चोरबाजार’, देश विकलात पण..’ ; शिवसेनेची जहरी टीका

December 23, 2021

यावल : आंतरजातीय विवाह केल्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी !

June 27, 2024

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

September 27, 2024

जळगावात ‘या’ ठिकाणी आहे, श्री गणेश विसर्जनास बंदी !

September 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group