मेष : जर तुम्ही आज प्रॉपर्टी डील करत असाल तर तो सौदा तुम्हाला तोट्यात टाकणार आहे त्यामुळे थोडावेळ थांबा. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तज्ञ लोकांशी संपर्क होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ : बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. वादविवाद टाळावेत. सहकार्यांशी सामंजस्याने वागावे. काहींना दगदग जाणवेल. आज तुम्ही तुमच्या रागीट स्वभावाला ऑफिसमध्ये जरा आवर घाला तसेच तुमच्या बोलण्यात कायम गोडवा ठेवा.ज्यामुळे तुमचे सहकारीही आनंदी होतील.
मिथुन : लव लाइफ चांगले राहणार आहे. जे आज शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांना भविष्यात नक्कीच मोठा नफा मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. चारचौघात कौतुक केले जाईल. नवीन परिचय होतील.
कर्क : वाहन चालवताना काळजी घ्यावी. अंदाज अचूक ठरतील. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सरकारी क्षेत्रातून लाभ होताना दिसतोय. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण झाल्याने तुमचा उत्साह वाढेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यापार्यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमची एकाग्रता वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे प्रेम अधिक दृढ होईल.
कन्या : घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
तुळ : तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आज दिवस तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. मनोबल कमी राहील. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संध्याकाळी डोकेदुखी, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
धनु : आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. लहान मुलांसोबत वेळ छान जाणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात काही दुरावा आला असेल तर आज त्यातही सुधारणा होईल.
मकर : वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आज तुमची आर्थिक स्थीती सुधारेल आणि तुम्हाला समाधान मिळेल.
कुंभ : मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मीन : वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जर तुम्ही आज शॉपिंगवर जास्त खर्च करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.