मेष : आज तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना दुपारनंतर घडणार आहे. दिवसाची सुरुवात जरी निराशाजनक झाली, तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढणार आहे. व्यापारात लाभ मिळेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडा थकवा जाणवू शकतो.
वृषभ : तुमची आर्थिकस्थिती आज चांगली राहील. आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतात. आपणाला दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आज ७६ टक्के भाग्य तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाची व दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. प्रवास आज नको. आज तुमची तब्येत बिघडू शकते.
मिथुन : आज आर्थिक फायदा होईल आणि मानसिक शांती मिळेल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. आज जमिनीशी संबंधित देवाणघेवाण करू शकता. दुपारनंतर काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. दुपारनंतर तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आज तुमच्या मुलाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते.
कर्क : तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वादविवाद वाढू शकतात. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. कामाचा ताण राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आज बायकोच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दुपारनंतर मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. स्वास्थ्य लाभणार आहे. आज जवळचा मित्रही तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू शकतो.
सिंह : आज तुम्ही सगळ्या चिंता बाजूला ठेवून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.आजच्या दिवसातील महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करून घ्यावीत. जोडीदारासोबत मतभेद होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढेल. आज थोडा सावध राहण्याचा दिवस असेल. तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.
कन्या : एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचे नियोजन कराल. तुमचा प्रभाव राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होणार आहे. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होणार आहे. आज तुम्हाला मित्रांकडून मदत मिळू शकेल. आज तुम्ही सर्दी, खोकला इत्यादी हंगामी आजारांना बळी पडू शकता. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
तुळ : आज शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो. तुम्हाला जाणवत असणारे नैराश्य दुपारनंतर कमी होणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ आहे. आमनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहात. कामाचा ताण कमी होणार आहे. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते.
वृश्चिक : आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून दुःखद बातमी येऊ शकते. आज शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. कामात अडचणी व अडथळे जाणवणार आहेत. आरोग्य जपावे. जचा दिवस थोडा त्रासाचा असेल. मनःस्ताप देणारी एखादी घटना दुपारनंतर संभवते. मनोबल कमी राहील. आज तुम्हाला भरपूर आर्थिक नफा मिळू शकतो.
धनु : आज जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. नोकरी व व्यवसायात तुमचा प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. ज काही तरी अघटित घडण्याच्या भीतीमुळे मानसिक तणाव राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आज आपणाला अनुकूलता लाभणार आहे. प्रभाव वाढेल. मूतखड्याच्या रुग्णांना आज थोडी काळजी घ्यावी लागेल.
मकर : व्यवसाय विस्तारासाठी आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला लाभ होऊ शकतो. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा ताण वाढणार आहे. सार्वजनिक कार्यात तुमचा सहभाग राहील. रागावण्याऐवजी इतरांचे शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : व्यापार करत असाल तर त्यात तुम्हाला आज मोठा फायदा होईल. गेले दोन दिवस जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता आज दुपारनंतर कमी होणार आहे. तुमचे आरोग्य सुधारेल. प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करा. प्रवासाचे योग संभवतात. मनोबल वाढणार आहे. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होणार आहेत. आज तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कोणताही निर्णय घ्यावा.
मीन : कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे चिंतेत असाल. दुपारनंतर काहींना आरोग्याचा त्रास होणार आहे. मनोबल कमी राहील. दैनदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा त्रासाचा असेल. वैवाहिक जीवनात आज मतभेदाची शक्यता आहे. प्रवास आज नकोत. आज देवाचे आशीर्वाद तुमच्यावर असतील.