मेष : जर तुम्हाला तुमच्या व्यवसाय गुंतवणूक करायची असेल किंवा वाढवायचा असेल तर त्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रलंबित सरकारी कामेही त्यांच्या सहकार्याने पूर्ण होतील. संपत्तीशी संबंधित कौटुंबिक वाद वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने मिटतील. प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल.
वृषभ : अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात गुंतले असाल तर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात अनपेक्षित व्यत्ययांचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो.आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.
मिथुन : व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरतील. वडिलांच्या बाजूच्या लोकांकडून तुम्हाला लाभ मिळू शकाल. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.
कर्क : आज या राशीच्या लोकांना लोभ टाळावा लागेल, चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना नुकसान आणि अपमान दोन्ही मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.
सिंह : राजकारणाशी निगडित लोकांसाठी वेळ लाभदायक आहे, कौशल्य आणि वर्तनाने सर्व काही साध्य होऊ शकते. कार्यक्षेत्रातील अडचणी संपतील आणि विरोधकही पराभूत होतील, त्यामुळे योजना पुढे नेण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील.
कन्या : कौटुंबिक विषमता अडचणीत भर घालू शकते. कौटुंबिक समस्यांबाबत कोणताही निर्णय घेणे कठीण होईल. तुम्ही केलेल्या कामाला विरोध होऊ शकतो. हातातील कामे पूर्ण करावीत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. स्त्री सहकार्यांची मदत मिळेल.
तूळ : राजकारणाशी संबंधित लोकांचे वर्चस्व वाढेल. दुपारपासून शुभवार्ता मिळत राहतील, त्यामुळे आवश्यक कामे करण्याचे शुभ योग आहेत.मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.
वृश्चिक : वडिलांच्या मार्गदर्शनाने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. पोट आणि डोळ्यांच्या दुखण्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी अस्थिरता येईल. आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.
धनू : संततीबाबत कोणतीही शुभ माहिती मिळाल्याने चिंता दूर होईल. व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. दिवस समाधानाचा जाईल. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील.
मकर : भावांच्या सहकार्याने व्यवसायात कामे होतील आणि लाभदायक व्यवसायही चालतील. दुपारनंतर मानसिक त्रासामुळे डोकेदुखीची शक्यता राहील. दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये. वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.
कुंभ : रोजगारामध्ये कौशल्य विकासाचा फायदा होईल आणि उत्पन्नही वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना विविध क्षेत्रात विश्वासार्हता मिळेल आणि अनेक अनुभवही मिळतील, ज्याचा भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.
मीन : विद्यार्थ्यांना भविष्याबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. अनैतिक कृत्य टाळा अन्यथा सामाजिक प्रतिष्ठा दुखावू शकते. वाहन आणि इमारतीशी संबंधित समस्या डोके वर काढू शकतात. दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.